breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबई

अरेरे हृदयद्रावक ः अलिबागमधील आरसीएफ कंपनीत भीषण स्फोट, 4 ठार तर 3 जखमी

अलिबाग । महाईन्यूज। विशेष प्रतिनिधी ।

रायगडच्या अलिबागजवळील असलेल्या आरसीएफ कंपनीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या स्फोटात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाल्याचे समजते.

रायगडच्या अलिबागजवळील असलेल्या आरसीएफ कंपनीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या स्फोटात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाल्याचे समजते. एसी प्लांटमध्ये बिघाड झाल्याने स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील अलिबागमधील थळ आरसीएफ कंपनीत भीषण स्फोट झाला. या अपघातातील जखमींवर आरसीएफ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आरसीएफ कंपनीतील स्फोट दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. तसेच, अग्निशमन दलाच्या गाड्याही दाखल झाल्या आहेत.

एसीचा कॉम्प्रेसर फुटल्याने कंपनीत स्फोट झाला आणि या स्फोटात तब्बल 4 जणांचा बळी गेला. याची माहिती कळताच तातडीने रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. जखमींची प्रकृती गंभीर असल्याचंही सांगितलं जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button