breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

GOOD NEWS: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! भारतीय रेल्वेच्या 35 हजार जागांसाठी भरती, वाचा सविस्तर

नवी दिल्ली: कोरोनाच्या संकटकाळात अनेकांनी त्यांची नोकरी गमावलेली आहे. काहींना कमी पगारात नोकरी करावी लागत आहे तर तर काहीजण अद्याप बिनपगारी काम करत आहेत. दरम्यान अशावेळी सरकारी नोकरीची अपेक्षा अनेकांना लागलेली असते. भारतीय रेल्वेकडून सरकारी नोकरीची सुवर्णसंधी देण्यात येत आहे. रोजगाराची ही महत्त्वाची संधी उपलब्ध करण्यात येत आहे. आरआरबी एनटीपीसी 2020 अंतर्गत ही नोकर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. ही संधी पदवीधर असणाऱ्या आणि नसणाऱ्याही तरुणांसाठी आहे.

रेल्वे भरती बोर्ड आणि नॉन टेक्निकल पॉप्यूलर कॅटेगरीअंतर्गत 35 हजार 208 जागांसाठी नोकरभरती होणार आहे. यामध्ये ऑनलाइन परीक्षा द्यावी लागणाार आहे. एकूण जागांपैकी 24 हजार 605 जागा पदवीधर तर उर्वरित 10 हजार 603 जागा नॉन पदवीधर तरूणांसाठी आहेत. ही परीक्षा घेण्याकरता रेल्वे भरती बोर्डाने EXAM Counducting Agency(ECA) नियुक्त केलेले आहे.

कोणत्या जागांसाठी नोकरभरती?

आरआरबी एनआरपीसी विभागातील क्लार्क कम टायपिस्ट, अकाऊंटस क्लार्क कम टायपिस्ट, टाईम कीपर, ट्रेन्स क्लार्क, कमर्शियल कम तिकिट क्लार्क, ट्रॅफिक असिस्टंट, गुड्स गार्ड, कमर्शियल अ‍ॅप्रेंटिस आणि स्टेशन मास्टर या पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा रेल्वेच्या विविध झोनसाठी घेण्यात येईल. रिक्त जागा, अर्ज प्रक्रिया आणि पात्रता याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर तुम्हाला सविस्तर माहिती मिळू शकतेय.

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी

वयोमर्यादा: सर्वसाधारण श्रेणीसाठी वयोमर्यादा 18 ते 33 वर्षे आहे; ओबीसीसाठी 18 ते 36 वर्षे आहे आणि अनुसूचित जाती/जमातीसाठी १८ ते ३८ वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे.

काय आहेत या नोकरीचे फायदे?

नोकरीमध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुलभूत वेतन तर मिळेलच पण त्याव्यतिरिक्त इतर काही भत्ते आणि फायदे देखील मिळतील. उमेदवाराच्या श्रेणीनुसार योग्य फायदा त्याला देण्यात येईल. -यामध्ये महागाई भत्ता (DA), घरभाडे (HRA), परिवहन भत्ता (Transport) पेन्शन योजना, वैद्यकीय फायदे आणि इतर काही विशेष भत्तेदेखील लागू होतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button