breaking-newsमहाराष्ट्र

रायगडावर शिवराज्याभिषेकाचा दैदिप्यमान सोहळा

रायगड – भिरभिरणारे भगवे ध्वज, जय जिजाऊ-जयशिवरायचा अखंड जयघोष, रंगबिरंगी फेटे-बाराबंदी-नऊवारी साड्या अशा पारंपारिक वेशभूषेतील अबालवृध्द शिवभक्त-इतिहासप्रेमी यासह ऊन-वारा-पावसाची साथ अशा उत्साही वातावरणात आज रायगडावर शिवराज्याभिषेकाचा दैदिप्यमान सोहळा झाला.

समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते मेघडंबरीतील शिवमूर्तीस सुवर्णनाण्यांचा अभिषेक होताच शिवभक्तांनी दिलेल्या “जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषणेने दुर्गराज रायगडचा कोना न कोना शहारून गेला.
रायगडावर आज सकाळी खासदार छत्रपती संभाजी राजे यांचे ढोलताशांच्या गजरात आगमन झाले. त्यांच्या हस्ते राजसदरेवर शिवराज्याभिषेकाला सुरवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विविध गडांवरून आणलेल्या पाण्याने तसेच दुग्धाभिषेक करण्यात आला. या वेळी युवराज शहाजीराजे, फिजीचे राजदूत एस. धृनीलकुमार, पशु व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर आदींसह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील शिवभक्त रायगडावर दाखल होत आहेत. यामुळे रायगडावर शिवभक्तीची लाट आली आहे. सहभागी विविध वयोगटातील तरुण, महिला मुले यांच्यामध्ये या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी चैतन्य संचारले आहे. रयतेचा राजा अशी ख्याती असणाऱ्या शिवरायांचा राज्याभिषेकाचा 345 वा वर्षसोहळा रायगडावर अनुभवण्यासाठी प्रत्येकजण आसुसलेला होता. जसे कार्यक्रम होतील तशा वाढत जाणाऱ्या जयघोषाच्या घोषणांनी एक वेगळेच चैतन्य अनुभवायस मिळत होते. अनेक शिवभक्त गडावर दंडवत घालत आले. शिवराज्याभिषेकासाठी सिंहगड, राजगड, पन्हाळगड, विशाळगड, तोरणा या पाच गडांचे पाणी आणण्यात आले.

यावेळी रयतेचा राजाने शेतकऱ्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली. पण आता हा शेतकरी जगण्यासाठी धडपडत आहे. कार्यक्रमात जसे स्फूर्तिदायक पोवाडे गायले जात होते, तशी पोवाड्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची अवस्थाही मांडली जात होती. यामुळे जल्लोषाला भावुकतेची किनार लाभली. शेताच्या या बांधावरती आले नवे दलाल, तेच झाले मालामाल, दादा तू झाला कंगाल,’ या शाहीर राजेंद्र कांबळे यांच्या ओळींना ही शिवप्रेमींनी दाद दिली. शेतकऱ्यांची अवस्था शाहीर मांडत असताना अवघा रायगड ही हेलवला होता. संभाजीराजे यांनी ही शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा भाषणात उल्लेख करून यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.

हजारो शिवभक्तांकडून अन्नछत्राचा लाभ… 
शिवराज्याभिषेकासाठी गडावर येणाऱ्या शिवभक्तांची अडचण लक्षात घेवून संभाजीराजे यांच्यावतीने गेल्या आठ वर्षांपासून अन्नछत्राचे आयोजन केले जाते. 4 ते 6 जून या कालावधीत गडावरील जिल्हा परिषदेच्या शेडमध्ये अन्नछत्राची सेवा दिवस-रात्र सुरु असते. याचा लाभ प्रत्येक शिवभक्त आवर्जुन घेतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button