breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपमहाराष्ट्रमुंबई

अंधेरीतील गोखले पूल वाहतुकीसाठी बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग?

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

मुंबईतील अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पुनर्बांधणीसाठी हा पूल सोमवार 7 नोव्हेंबरपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.

मुंबईतील अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पुनर्बांधणीसाठी हा पूल सोमवार 7 नोव्हेंबरपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. पुनर्बांधणीसाठी हा पूल किमान दोन वर्ष सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूल बंद झाल्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी वाहतुकीसाठी 6 पर्यायी मार्ग दिलेले आहेत.

अंधेरी पूर्व गोखले पूलाची काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांनी पाहणी केली होती. मुंबई महापालिकेने नियुक्त केलेल्या सल्लागार कंपनीने गोखले पूल वाहनांच्या वाहतुकीसाठी असुरक्षित असल्याचे सांगत तो बंद करण्याची सूचना केली होती.

अंधेरी गोखले पूल बंद असल्याने 6 पर्यायी मार्ग मुंबई वाहतूक पोलिसांनी उपलब्ध करून दिले आहेत. खार सबवे (खार), मिलन सबवे उड्डाणपूल (सांताक्रूझ), कॅप्टन गोरे उड्डाणपूल विलेपार्ले उड्डाणपूल (विलेपार्ले), अंधेरी सबवे (अंधेरी), बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल (जोगेश्वरी), मृणालताई गोरे उड्डाणपूल (गोरेगाव) हे 6 मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाच्या कामासाठी गोखले रोड पूल वाहतुकीसाठी बंद होत असल्याने मुंबई पोलिसांनी दिलेल्या पर्यायी मार्गाबाबत वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जुलै 2018 मध्ये गोखले रोड पुलाचा एक भाग कोसळला होता. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मुंबई महापालिकेने शहरातील पुलांच्या सुरक्षितेसाठी ऑडिट केले. आयआयटी-मुंबईद्वारे शहरातील पुलांचे ऑडिट करण्यात आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button