breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रराजकारण

सीमाप्रश्नी कर्नाटक विरोधातला ठराव विधानसभेत एकमताने मंजूर

मराठी भाषिक जनतेसोबत मराराष्ट्र सर्व ताकदीनिशी उभा राहील
नागपूर :

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत ठराव मांडला. हा ठराव विधानसभेत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे. ठरावात ८६५ गावं असा उल्लेख होता, त्यात बेळगाव, कारवार, निपाणी बिदर भालकी सह असा स्पष्ट उल्लेखाचा विरोधकांचा आग्रह मंजूर करण्यात आला आहे.
बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर शहरे आणि कर्नाटकातील ८६५ मराठी भाषिक गावे कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सर्व आवश्यक कायदेशीर पाठपुरावा केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरावात मांडले आहे.
केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने कर्नाटक सरकारला विनंती करावी आणि सीमाभागातील मराठी लोकांच्या सुरक्षेची हमी देण्यासाठी सरकारला समज देण्यात यावी, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरावात मांडले आहे.
सीमाप्रश्नी कर्नाटक विरोधातला ठराव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला मात्र, सुप्रीम कोर्टात निर्णय प्रलंबित असेपर्यंत केंद्रशासित करा या ठाकरेंच्या मागणीचा ठरावात समावेश नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button