breaking-newsराष्ट्रिय

अर्धा डझन पासपोर्ट बाळगल्याबद्दल नीरव मोदीविरोधात एफआयआर

नवी दिल्ली – पंजाब नॅशनल बॅंकेमध्ये तब्बल 2 अब्ज डॉलरचा घोटाळा करणारा अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदी याच्याकडे किमान अर्धा डझन पासपोर्ट असल्याचे निष्पन्न झाले आहे. यासंदर्भात नीरव मोदीविरोधात नवीन एफआयआर दाखल करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नीरव मोदी बेल्जियम असल्याचे आणि पासपोर्ट रद्द केल्यानंतरही तो तेथून प्रवासही करत असल्याचे गुप्तचर संस्थांनी शोधून काढले आहे. त्यामुळेच त्याच्याकडे एकापेक्षा अधिक पासपोर्ट असल्याचे शोधून काढण्यात आले. तपासादरम्यान नीरव मोदीकडे किमान 6 पासपोर्ट असल्याचे समजले आहे. त्यापैकी दोन पासपोर्ट अलिकडच्या काळात सक्रिय आहेत. तर उर्वरित चार पासपोर्ट सक्रिय नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.

सक्रिय असलेल्या दोन पासपोर्टपैकी एकावर नीरव मोदीचे पूर्ण नाव आहे, तर दुसऱ्यावर केवळ त्याचे पहिले नाव आहे. त्याच पासपोर्टच्या आधारे त्याने इंग्लंडमधील 40 आठवड्यांचा व्हिसाही मिळवला आहे. त्याच पासपोर्टच्या आधारे तो वेगवेगळ्या देशांना प्रवास करत असतो. त्याचा दुसरा पासपोर्टही भारताने रद्द केला आहे. या दोन्ही पासपोर्टबाबतची माहिती इंटरपोलला कळवण्यात आली आहे. मात्र कागदपत्रे रद्द करण्यासाठी विविध देशांबरोबर यंत्रणा अस्तित्वात नसल्याने हे पासपोर्ट रद्द केले जाऊ शकलेले नाहीत. नीरव मोदीला अटक करावी यासाठी सीबीआय आणि ईडीकडून पासपोर्ट रद्द केल्याचे पुरावेही इंटरपोलला दिले आहेत. या संदर्भात आता नव्याने “एफआयआर’दाखल केला गेला आहे. नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट काढावे अशी मागणीही सीबीआय आणि ईडीकडून झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button