breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘महाविकास आघाडी सरकार पाडण्यात अजित पवार यांची मोठी मदत’; भाजप नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : महाविकास आघाडी सरकार पाडण्यात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मोठी मदत झाली, असा मोठा गौप्यस्फोट ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते. दरम्यान यावरून महाविकास आघाडीत वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

गिरीश महाजन म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत जाऊन आले असून चर्चा सुरू आहे, लवकरच निर्णय होईल.. खाते आणि नावानूसार चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या कोणत्या मंत्र्यांवर भाजप नाराज असे काहीही नाही. शिवसेनेचा निर्णय मुख्यमंत्री घेत आहेत, भाजपचे भाजपकडे आहे. ठाकरे गटाला रोजच धक्के बसत आहेत. त्यांना अनेक झटके बसत आहेत आणि पुढेही बसणार आहेत. सकाळच्या भोंग्याशिवाय कोणीही त्यांच्यासोबत कोणीही नाही. अनेक आमदार खासदारही पुढे त्यांना सोडून जाणार आहेत.

हेही वाचा – भाजपातर्फे ‘सोशल मीडिया इंफ्ल्युएसंर संमेलन’ उत्साहात

शिंदे गटातील आमदारांना जास्त निधी दिला जात आहे अशी तक्रार काही आमदारांनी केली आहे असा प्रश्न विचारला असता गिरीश महाजन म्हणाले की, माझ्याकडे अशी कोणतीही तक्रार आलेली नाही. आमच्या लोकांनी अशी कोणतीही तक्रार केलेली नाही. व्यवस्थित निधी वाटप चाललेला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी अशी तक्रार केली असेल. मागच्या काळामध्ये काय झाले हे आपण तपासून बघावं. अजित दादांनी सुद्धा अशी तक्रार परवा केली. माझं अजितदादांना म्हणनं आहे की हे सरकार पडण्यामध्ये किंवा हा मोठा गट या बाजुला येण्यामध्ये तुमची आम्हाला वित्तमंत्री म्हणून मोठी मदत आम्हाला झाली आहे. तुम्ही शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांना काय निधी दिला. आपण फक्त राष्ट्रवादीच्या आमदारांना निधी दिला. त्यामुळे या उठावाला जेवढं उद्धव ठाकरे जबाबदार आहेत तेवढचं अजित पवार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button