breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची २१ सप्टेंबरला सर्वसाधारण सभा

मुंबई – जिल्हा कबड्डी संघटनांच्या झालेल्या ऑनलाईन बैठकीत संघटनेच्या घटना दुरुस्तीला विरोध झाला. त्यामुळे घटना दुरुस्तीबाबतचा अंतिम निर्णय आणि दुरुस्तीला मंजुरी घेण्यासाठी २१ सप्टेंबरला सह्याद्री अतिथीगृहात महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची प्रत्यक्ष सर्वसाधारण सभा घेतली जाणार आहे, अशी माहिती संघटनेने दिली.

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली मंगळवारी कार्यकारणी समिती आणि विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली. ऑनलाईन झालेल्या या विशेष सभेत घटना दुरुस्तीला काही जिल्हा संघटनांनी विरोध केला. त्यामुळे त्यावर प्रत्यक्ष सभेत चर्चा करण्यासाठी २१ सप्टेंबरला संघटनेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या घटनेनुसार राज्य कबड्डी संघटनेच्या घटनेत काही बदल करावे लागणार आहेत. त्यामुळे ही घटना दुरुस्ती आवश्यक आहे, असे संघटनेचे सरकार्यवाह ऍड. आस्वाद पाटील यांनी सांगितले. जिल्हा संघटनांच्या बैठकीत महाकबड्डी लीगबाबतही चर्चा करण्यात आल्याचे समजते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button