Uncategorizedताज्या घडामोडीदृष्टीक्षेपमनोरंजनमराठवाडामहाराष्ट्रराष्ट्रिय

गौतमी पाटीलने बीडमध्ये लावली आग; 1 तास ट्रॅफिक जाम…

बीड ः बीड – गौतमी पाटील हे नाव सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चांगलच चर्चेत आहे. त्यासोबत चर्चेत आहेत गौतमी पाटीलने केलेल्या डान्सचे व्हिडीओ आणि याच व्हिडीओमुळे आज गौतमी पाटील सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. डान्स दरम्यान केलेलं अंगविक्षेप यामुळे गौतमीचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून, नेटकरी देखील तिच्या या व्हिडिओवर जोरदार कमेंटचा वर्षाव करत असतात.

दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय असलेली लावणी कलाकार गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात प्रचंड गोंधळ झाल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. या कर्यक्रमादरम्यान अचानक शेकडो प्रेक्षक स्टेजवर चढले त्यामुळे आयोजकांना हा कार्यक्रम अर्धवट थांबवावा लागला. एवढच काय तर रस्त्यालगत 1 तास ट्रॅफिक जाम सुद्धा झालं होतं. यावेळी प्रवासी नागरिकांना मोठा त्रास देखील सहन करावा लागला होता.

झालं असं की.., बीड शहरातील एका बियर बार आणि हॉटेलच्या उद्घाटनाप्रसंगी गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान गौतमीची एक झलक आणि तिचा डान्स पाहण्यासाठी तरुणाईने प्रचंड गर्दी केली. मात्र, काही अतिउत्साही तरुण अक्षरशः स्टेजवर चढले आणि एकच गोंधळ माजवला. या प्रकारामुळे आयोजकांना कार्यक्रम देखील थांबवावा लागला होता.

दरम्यान, तरुणांनी मोठा गोंधळ केल्याने पोलिसांसह आयोजकांची तारांबळ उडाली. गर्दी पांगवण्याकरिता पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला. दिवसेंदिवस गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ वाढत असल्याने पोलीस यंत्रणेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत असल्याचं दिसून येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button