breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी जनतेची माफी मागावी : धनंजय मुंडे

मुंबई – शालेय शिक्षण विभागांतर्गत सर्व शिक्षा अभियानाच्या डॉ. शुभा साठे लिखित समर्थ श्री रामदास स्वामी पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबदल अवमानकारक मजकूर छापण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.

Dhananjay Munde

@dhananjay_munde

छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल अवमानकारक मजकूर असलेल्या पुस्तकांचे फक्त वितरण थांबवून चालणार नाही, तर लेखक, प्रकाशकावर कठोर कारवाई करा. संभाजी महाराजांच्या अवमानाबद्दल @TawdeVinod साहेब, महाराष्ट्रातील जनतेची माफी मागा !

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांनी तात्काळ या पुस्तकांचे वितरण थांबविण्यात यावे असे पत्र राज्यातील सर्व जिल्हा शिक्षणधिकाऱ्यांना पाठविले आहे. पंरतु राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आता आक्रमक भूमिका घेतली असून संभाजी महाराजांच्या अवमानाबद्दल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button