breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीमुंबईराजकारण

गँगस्टर सुरेश पुजारीला फिलिपीन्सहून भारतात आणलं; मुंबई पोलिसांची टीम दिल्लीत दाखल!

मुंबई |

कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारीला अखेर भारतात आणलं गेलं आहे. फिलिपीन्समधून त्याला अटक करण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यात त्याला अटक करण्यात आली होती. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. याशिवाय मुंबई आणि कर्नाटकात तो वसूलीच्या अनेक प्रकरणांमध्ये पोलिसांना हवा होता. त्याला भारतात आणलं गेल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून देण्यात आलेली आहे. आयबी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी पुजारीला दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतलं. केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीनंतर त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं जाणार आहे.

मुंबई गुन्हे शाखेची एक टीम पुजारीला ताब्यात घेण्यासाठी अगोदरच दिल्लीत पोहचलेली आहे. मुंबई आणि ठाणे पोलिसांनी जबरदस्ती वसुलीच्या अनेक प्रकरणांनंतर २०१७ आणि २०१८मध्ये त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस देखील काढली होती. अधिकाऱ्याने हे देखील सांगितले की, पुजारी १५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून फरार होता आणि ऑक्टोबरमध्ये फिलिपीन्समध्ये त्याला अटक केली गेली होती. त्याच्याविरोधात ठाण्यात जबरदस्ती वसुलीचे २३ गुन्हे दाखल आहेत. सुरेश हा गँगस्टर रवी पुजारीचा जवळचा नातलग आहे आणि २००७ मध्ये त्याच्यापासून तो वेगळा झाला होता. त्यानंतर तो परदेशात पळून गेलेला होता. सुरूवातीच्या काळात त्याने रवी पुजारी आणि अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन सोबत काम केलं आणि नंतर त्याने स्वत:ची गँग तयार केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button