breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकमहाराष्ट्रराजकारणविदर्भ

नागपूरच्या तुरुंगात गँगस्टर अरुण गवळी घेतोय पदवी शिक्षण

नागपूर |

खून प्रकरणात नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला गुंड अरुण गवळी महाराष्ट्रातील मुक्त विद्यापीठातून कला शाखेतून पदवीचे शिक्षण घेत आहे. एका अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. कारागृह अधीक्षक अनूप कुमरे यांनी सांगितले की, गवळी याने नाशिकमधील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून (वायसीएमओयू) २०१९ मध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स (बीए) अभ्यासक्रमासाठी नोंदणी केली होती. बीए अभ्यासक्रमात गवळी पहिल्या आणि दुसऱ्या वर्षात प्रत्येकी एका विषयात नापास झाला आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, त्याला ATKT तरतुदीअंतर्गत अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात प्रवेश मिळाला आहे.

अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की, गवळीसह नागपूर मध्यवर्ती कारागृहातील एकूण २२९ कैदी सध्या बीए ते मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) पर्यंत विविध शिक्षण घेत आहेत. त्यापैकी १४७ महिलांसह १५७ कैदी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून बीए करत होते, तर दोन महिलांसह ७२ कैद्यांनी इग्नूमध्ये नोंदणी केली होती. कारागृहातील खुनातील दोषींपैकी एक एमबीए करत आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. “कैद्यांना विद्यापीठांमधून पोस्टाने पुस्तके मिळतात. कैद्यांची परीक्षा नागपूर मध्यवर्ती कारागृहात घेतली जाते, ज्याला दोन विद्यापीठांनी परीक्षा केंद्र म्हणून घोषित केले आहेत,” असे अधिकाऱ्यांनी म्हटले.

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणी कुख्यात गुंड अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २ मार्च २००७ रोजी मुंबईमधील असल्फा भागात कमलाकर जामसंडेकर यांची घरात घुसून गोळीबार करत हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी २००८ मध्ये अरुण गवळीला अटक केली. यानंतर २०१२ मध्ये विशेष न्यायालायने अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button