ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नगरसेवक विलास मडिगेरी यांची संकल्पना; शहरातील पहिले फिरते जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन

पिंपरी चिंचवड | भोसरी, इंद्रायणीनगर प्रभागातील कार्यक्षम नगरसेवक विलास मडिगेरी यांनी प्रभागातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी थेट फिरते जनसंपर्क कार्यालयाची संकल्पना प्रत्यक्षात उतरविली. पिंपरी चिंचवड शहरातील एकमेव फिरते जनसंपर्क कार्यालय बघून उद्घाटनासाठी आलेले भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मडिगेरी यांच्या अभिनव संकल्पनेची प्रशंसा केली आहे.

यावेळी उदघाट्न करतांना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे, महापौर उषा उर्फ माई ढोरे, नगरसेवक विलास मडिगेरी प्रामुख्याने उपस्थित होते. चारचाकी गाडीमध्ये सुसज्ज अशी यंत्रणा वापरून फिरते जनसंपर्क कार्यालय थाटले आहे. यामध्ये इंटरनेट सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.

इंद्रायणीनगर प्रभागातील प्रत्येक विभागात हे कार्यालय फिरते राहून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी महत्वाचा दुवा ठरणार आहे. फिरत्या जनसंपर्क कार्यालयामुळे स्थानिक महिलांना सुद्धा थेट आपल्या दारात आपल्या समस्या मांडता येणार आहेत. त्यामुळे या संकल्पनेचे प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

याविषयी बोलतांना नगरसेवक विलास मडिगेरी म्हणाले कि बरेच वेळा प्रभागातील विकासकामांचा आढावा व प्रत्यक्ष पाहणीत वेळ जातो. यामुळे नागरिकांना कधी कधी आपल्या रोजच्या कामातून वेळ काढणे शक्य होतं नाही. त्यामुळे विशेषतः महिला भगिनींची अडचण होतं होती. त्यावर उपाय म्हणून फिरते जनसंपर्क कार्यालय उभारले आहे. या माध्यमातून महापालिकेच्या कोणत्याही कामाचे तात्काळ समाधान होणार आहे. व ही संकल्पना नागरिकांच्या पसंतीस ठरली असून नागरिकांचे काम होणार असल्याने समाधान व्यक्त केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button