breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

नाशिकमध्ये आयकर विभागाची आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

नाशिक : नाशिकमध्ये आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. २०० हून अधिक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून छापेमारी करण्यात आली आहे. २० एप्रिलला पहाटे सहा वाजेच्या सुमारास सुरू झालेली कारवाई २५ एप्रिलपर्यंत चालली. सलग ६ दिवस बांधकाम व्यावसायिकांवर छापेमारी करण्यात आली आहे.

या छापेमारीत नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांचे ३३३३ कोटींचे बेहिशोबी व्यवहार उघडकीस आली आहेत. प्रशासनातील सुमारे दीड हजार अधिकारी राजकीय नेते आणि व्यापाऱ्यांची गुंतवणूक असल्याची माहिती समोर आली आहे. सलग सहा दिवस दोनशेहून अधिक राज्यस्तरीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून ही चौकशी सुरू होती.

नाशिक आयकर अन्वेषण विभागासह छत्रपती संभाजीनगर, ठाणे, पुणे, मुंबई व नागपूर कार्यालयातील सुमारे २०० हून अधिक कर्मचाऱ्यांचे पथक कारवाई करत होते. या पथकाने बांधकाम व्यावसायिकांची ४० ते ४५ कार्यालये, बंगले, फार्म हाऊस ठिकाणी छापे टाकले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button