Views:
214
पुणे – पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील स्टेडियममध्ये विक्रमांवर विक्रम होत असताना पाहायला मिळत आहे. पांड्या याच्या एक दिवसीय सामन्यामधील सर्वाधिक धावा काढण्याच्या रेकॉर्डनंतर आता रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनीही सुपरहिट खेळी केली आहे.
पुण्यातील गहुंजे येथील स्टेडियममध्ये सुरू असलेल्या ओडीआय सामन्याच्या शेवटच्या आणि निर्णायक दिवशी भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यादरम्यान रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी धमाकेदार खेळी करत 91 बॉलवर 103 धावा काढून जोडीने एकदिवसीय सामन्यातील आपल्या 5000 धावांचा विक्रम पूर्ण केला आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड खेळल्या जाणाऱ्या सामन्यादरम्यान रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीने एकत्रित 5023 धावा पूर्ण करून वन-डे क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणार्या जोडीच्या यादीत आपलं नाव कोरलं आहे. वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या जोडीमध्ये आता 5000 धावा पूर्ण करून रोहित शर्मा आणि शिखर धवन ही जागतिक पातळीवरील सातवी जोडी ठरली आहे.
सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्या कार्यकाळात त्यांनी 8227 धावा पूर्ण करून ती जगातील पहिली वन-डे क्रिकेटमधील सर्वात जास्त धावांचा विक्रम करणारी पहिली जोडी ठरली होती, त्यांच्या नावे अजूनही हा रेकॉर्ड तसाच आहे. त्यांच्यानंतर श्रीलंकेच्या कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने या जोडीचा सर्वाधिक धावांचा विक्रम आहे.
Like this:
Like Loading...