TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

पुण्यातील भाजपाचे खासदार गिरीश बापट यांचे निधन

पुणे : भाजपचे महाराष्ट्रातील सर्वात जुने नेते गिरीश बापट यांच्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. पुणे लोकसभा खासदार व राज्याचे माजी मंत्री पुणे जिल्हा पालकमंत्री मा. गिरीष बापट यांचे वय ७४ यांचे दिनानाथ हॉस्पिटल मध्ये दिर्घ आजाराने दुःखद निधन झाले असल्याचे वृत्त समोर आले आहे. गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत होते. बापट गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते.

राजकारणातील गेल्या पाच दशकातला विरोधी व सत्ताधारी भाजपाचा दमदार नेता हरपला. 72 वर्षीय गिरीश बापट यांनी आपल्या चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत संघ स्वयंसेवक, कामगार नेते, नगरसेवक, आमदार आणि खासदार अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. आजही पुण्याच्या स्थानिक राजकारणावर गिरीश बापटांचे वर्चस्व आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या पुणे कसबा पेठ पोटनिवडणुकीत त्यांना व्हीलचेअर वरती बसून बापट साहेब प्रचार करायला आले होते.

गिरीश बापट हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. जनसंघातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. नगरसेवक म्हणून सुरुवात केलेले गिरीश बापट 1995 पासून सलग ५ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे मोहन जोशी यांचा पराभव केला होता.

गिरीश बापट हे पुण्याच्या राजकारणात त्यांच्या ‘सर्वसमावेशक’ राजकारणासाठी ओळखले जातात. विरोधी पक्षाची सत्ता असली तरी आपले काम साधून घेण्याची हातोटी गिरीश बापट यांना उत्तम अवगत आहे. दांडगा जनसंपर्क ही गिरीश बापट यांची जमेची बाजू मानली जाते. सगळ्यांशी मिसळून राहण्याच्या वृत्तीमुळे गिरीश बापट यांचा राजकीय प्रवास नेहमीच सुकर होत असे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button