breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

पोलिसांवर हात उचलला, पोलिसांनीही चांगलाच धडा शिकवला

मुंबईमधील जुहू येथील फेरीवाल्यांविरोधात कारवाई करायला गेलेल्या पोलिसांच्या पथकावरच फेरीवाल्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. वाहतूकीला अडथळा निर्माण करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचे पथक गेले असता फेरीवाल्यांनी पोलीस अधिकाऱ्यांवरच हात उचलला. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरिक्षक परमेश्वर गनमे यांनी पोलिसांवर हात उचलणाऱ्या फेरीवाल्यांना चांगलाच पोलिसी खाक्या दाखवला.

मिळालेल्या माहितीनुसार डीएन नगर पोलीस स्थानकातील काही अधिकारी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाबरोबर जुहू गल्ली तसेच अंधेरीमधील गिलबर्ट हिल्स रोडवरील फेरीवाल्यांविरोधात कारवाई करत होते. त्यावेळी तेथील फेरीवाल्यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांची कॉलर पकडली आणि त्यांना धक्काबुक्की केली. पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या फेरीवाल्यांना चांगलाच चोप देत ताब्यात घेतले. मात्र ही कारवाई सुरु असताना काही फेरीवाल्यांनी शुटींग करुन पोलीस फेरीवाल्यांना उगच त्रास देत असल्याचे सांगत हा व्हिडीओ व्हायरल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.

Embedded video

Nishant D Sarwankar@ndsarwankar

Truth behind this video … police beating hawkers because they attack police…hawkers at Andheri West are so rude that we must support D N Nagar Police … Sr PI Gamane himself on lead

See Nishant D Sarwankar’s other Tweets

पोलीस उपायुक्त (झोन नऊ) परमजीत सिंग दहिया यांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवर फेरीवाल्यांनी हल्ला केला. ‘अनेकदा या परिसरातील नागरिकांनी फेरीवाल्यांमुळे त्रास होत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. हे फेरीवाले ड्रग्स, मुलींची छेड काढणे यासारख्या बेकायदेशीर कामांमध्येही सहभागी असल्याच्या तक्रारी आम्हाला मिळाल्या होत्या. म्हणूनच या फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पोलीस तेथे गेले असता त्यांनी पोलिसांवरच हल्ला केला. या हल्ल्यात काही पोलीस अधिकारी किरकोळ जखमी झाले आहेत,’ अशी माहिती दहिया यांनी दिली.

ज्या पोलीस अधिकाऱ्यांवर फेरीवाल्यांनी हल्ला केला त्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरिक्षक परमेश्वरही होते. ‘रस्ता मोकळा करण्याच्या उद्देशाने अतिक्रमण हटवण्याचे काम सुरु होते. तेव्हा या फेरीवाल्यांनी आमच्या पथकावर हल्ला केला. यामध्ये आमच्यापैकी काही अधिकाऱ्यांच्या पायाला जखमा झाल्या. कारवाई करण्यात आलेल्या परिसरामधील वाफा मेडीकल येथे २०१६ साली आग लागली होती. त्यावेळी अग्निशामन दलाच्या गाड्यांना अरुंद रस्त्यावर बसलेल्या फेरीवाल्यांमुळे घटनास्थळी पोहचता आले नाही. या घटनेमध्ये नऊ जणांचा प्राण गेले होते,’ अशी माहिती गनमे यांनी दिली.

View image on TwitterView image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Senior Police Inspector Parmeshwar on video of a police team including him thrashing hawkers at Juhu, Mumbai: There was a major fire at Wafa Medicals in the locality in 2016 & fire brigade couldn’t reach the spot because of illegal hawkers narrowing the route, causing 9 deaths

21 people are talking about this

ANI

@ANI

Mumbai Police: Police party including senior PI was assaulted by local hawkers&hooligans. Case lodged against miscreants under section 353(deterring public servant from performing duty), 332 IPC(criminal force&assault on public servant). Video was shot during detention of accused

ANI

@ANI

Senior Police Inspector Parmeshwar: So BMC & police conduct regular drive in the area but hawkers occupy it again & again.Police & BMC went there with staff when 4 people surrounded an inspector & thrashed him. They attacked us after which we took action. Case registered.(4.4.19) https://twitter.com/ANI/status/1113916750628839424 

See ANI’s other Tweets

या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरु केल्याची माहिती ट्विटवरुन दिली आहे.

Mumbai Police

@MumbaiPolice

Zonal DCP is seized of the matter and has been asked to enquire into it.

See Mumbai Police’s other Tweets

पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरोधात आयपीसी कलम ३३२ (सरकारी अधिकाऱ्यांवर हात उचलणे,) आणि कलम ३५३ (सरकारी कामात अडथळा आणणे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर घटनास्थळावरुन पळ काढलेल्या एकाचा शोध सुरु असल्याची माहिती गनमे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button