breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरीगाव ते पिंपळे सौदागर दरम्यानच्या समांतर पुलाचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते भूमिपूजन

पिंपरी – पिंपरीगाव ते पिंपळे सौदागर या गावांना जोडणाऱ्या पवना नदीवर उभारण्यात आलेल्या नवीन समांतर पुलाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. या मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लावल्याबद्दल दोन्ही गावातील नागरिकांनी भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांचे आभार व्यक्त केले.

याप्रसंगी महापौर उषा ढोरे, आयुक्त राजेश पाटील, उपमहापौर केशव घोळवे,सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, नगरसेवक नाना काटे, नगरसेविका निर्मला कुटे आदी मान्यवर उपस्थित होते.मागील नऊ-दहा वर्षांमध्ये पिंपरीगाव, पिंपळे सौदागर, काटे पिंपळे या गावांमधील लोकवस्ती आणि लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहनांच्या रहदारीमध्येही वाढ झालेली आहे. त्यामुळे या गावांना जोडणारा जुना पूलही अपुरा पडत होता. तसेच सदर पुलाचीही दुरावस्था होऊन पुलावर खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनचालकांना धोकादायक पद्धतीने वाहन चालवावे लागत. तसेच या पुलावर संध्याकाळच्या वेळी दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होऊन त्याचा मनस्ताप वाहनचालक आणि स्थानिक रहिवाशांना सहन करावा लागत होता.

दरम्यान, यासंदर्भात पिंपरीतील भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी याठिकाणी समांतर पुल उभारण्यात यावा ही मागणी केली होती. तसेच सातत्याने पाठपुरावा करून सदर कामासंदर्भात तब्बल तीन वर्षे आयुक्त आणि प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न नगरसेवक वाघेरे यांनी केले होते. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला आज यश मिळाले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button