breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठी कलाकारांचा रसिकांना संदेश. . .

मुंबई | सध्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. लॉकडाउनमुळे आणि कोरोनाच्या भीतीमुळे सध्या अनेकांना घरातच रहावं लागत आहे. त्यामुळे त्यांचं रूटीन बदललं आहे. याचाच प्रभाव त्यांच्या मानसिक आरोग्यावर पडत आहे. अश्यातच घरात राहून अनेकांमध्ये एकटेपणाची भावना जागृत होत आहे.

जर लॉकडाउन असाच पुढे सुरू राहिला तर लोकांना अनेक मानसिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अमेरिकेत तर अनेक लोकांनी यासाठी डॉक्टरांकडे मदत मागितली आहे. पण कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल तर सध्यातरी घरी रहाणे हा एकच पर्याय समोर आहे.

अश्यातच लोकांच्या मनामद्धे एकटेपणाची भावना जागृत होऊ नये यासाठी अनेक सेलिब्रिटी पुढे सरसावले आहेत, सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधने अश्या अनेक गोष्टी करताना पाहायला मिळतात,अश्यातच ..

दीपाली सैयद,हार्दिक जोशी,मानसी नाईक,देवदत्त नागे,संदीप पाठक,संस्कृती बालगुडे,अभिनय बेर्डे,अक्षया देवधर, पुनीत बालन,स्मिता शेवाळे,भार्गवी चिरमुले, किरण गायकवाड,पुष्कर जोग,स्मिता गोंदकर,सुयश टिळक,संग्राम साळवी. सेलिब्रिटींनी एकत्र येऊन एक संदेश लोकांसाठी तयार केला आहे, त्यात ते सांगतात कि सद्य परिस्थितीचा सामना आपण सगळेच करतोय त्यामुळे स्वतःला एकटं समजू नका, आणि सर्वांच्या सुरक्षिततेसाठी घरी राहा, आणि स्वतःची काळजी घ्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button