breaking-newsपुणेमहाराष्ट्र

वाहन चालक चाचणी कठीण

महिन्याला दीड हजार जण नापास; अत्याधुनिक चाचणी मार्गाचा अनेकांना धसका

घाटामध्ये चढावर गाडी थांबवून पुन्हा पुढे नेता येते का?  योग्य पद्धतीने मोटार मागे घेऊन पार्किंगमध्ये लावता येते का? आणि कमी अंतरामध्ये वळणे घेता येतात का.. या सर्व प्रश्नांची उत्तरे हो असतील तरच तुम्हाला प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) मोटार चालविण्याचा परवाना मिळू शकतो. कारण, पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांची मोटार चालविण्याची चाचणी घेण्याचा अत्याधुनिक चाचणी मार्ग तितकाच कठीण आहे. शंभर- दोनशे नव्हे, तर महिन्याला सुमारे दीड हजार नागरिक या चाचणीमध्ये नापास होतात. त्यामुळे या चाचणी मार्गाचा अनेकांनी धसका घेतला आहे.

चालक प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेच्या कासारवाडी येथील जागेत ‘अल्ट्रा मॉडेल’ प्रकारातील हा चाचणीमार्ग सुमारे तीन वर्षांपूर्वी उभारण्यात आला. महाराष्ट्रातील हा एकमेव चाचणी मार्ग असून, तत्कालीन परिवहन आयुक्त महेश झगडे यांच्या कालावधीत तो कार्यान्वित करण्यात आला. योग्य पद्धतीने प्रशिक्षित असे चालक घडविण्यासाठी या चाचणी मार्गाच्या उभारणीसाठी राज्य मोटार ड्रायव्हिंग असोसिएशनेही पुढाकार घेतला होता. आळंदी रस्ता येथे होणारी मोटार चालविण्याची चाचणी आता कासारवाडी येथे घेतली जाते.

चाचणी मार्गावर तीन वेगवेगळ्या आणि कठीण चाचण्या घेतल्या जातात. मागील तीन वर्षांचा आढावा घेतल्यास या चाचणी मार्गावरील चाचणीसाठी चालकांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे नापास होणाऱ्यांची संख्या काहीशी कमी होत असली, तरी दिवसाला सुमारे ५० अर्जदार अद्यापही नापास होत आहेत.

पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरामधून वाहन चालविण्याचा परवाना मागणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सध्या या चाचणीसाठी सुमारे दोन महिन्यांपर्यंत प्रतीक्षा यादी आहे. परवाना मागणाऱ्यांची संख्या आणि चाचणी मार्गाची क्षमता पाहता मोठय़ा प्रमाणावरील नागरिकांना चाचणीसाठी प्रतीक्षेत रहावे लागते. त्यामुळे असा आणखी चाचणी मार्ग उभारण्यापूर्वी किंवा सध्याच्या चाचणी मार्गाची क्षमता वाढविण्यापूर्वी आळंदी रस्ता येथेही पूर्वीप्रमाणे चाचणी घेण्यात यावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.

मोटार चालकाची चाचणी अशी होते

चाचणी मार्गावर चालकाची तीन प्रकारे चाचणी घेतली जाते. त्यात आठ या मोठय़ा आकाराच्या इंग्रजी आकडय़ावर गाडी चालविणे. त्यातून कठीण वळणांची परीक्षा होते. त्यानंतर एच या इंग्रजी अक्षरामध्ये चालकाची चाचणी घेतली जाते. मोटार पुढे-मागे घेऊन पार्किंगमध्ये मोटार व्यवस्थित लावता येते का, हे त्यातून तपासले जाते. सर्वात महत्त्वाची आणि कठीण चाचणी चढाच्या रस्त्यावर घेतली जाते. यामध्ये ६० अंशाच्या चढावर मोटार नेऊन मध्येच ती बंद करायची आणि त्यानंतर चढावरच ती पुन्हा सुरू करून पुढे न्यायची. याच चाचणीचा चालक धसका घेतात आणि त्यातच अनेकजण नापास होत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे चाचणी मार्गावर मानवी हस्तक्षेप नाही. मार्गावर बसविलेल्या ‘सेन्सर’च्या मदतीने संगणकाकडूनच संबंधिताला गुण दिले जातात. मोटार चालकाची चाचणी अशी होते

चाचणी मार्गावर चालकाची तीन प्रकारे चाचणी घेतली जाते. त्यात आठ या मोठय़ा आकाराच्या इंग्रजी आकडय़ावर गाडी चालविणे. त्यातून कठीण वळणांची परीक्षा होते. त्यानंतर एच या इंग्रजी अक्षरामध्ये चालकाची चाचणी घेतली जाते. मोटार पुढे-मागे घेऊन पार्किंगमध्ये मोटार व्यवस्थित लावता येते का, हे त्यातून तपासले जाते. सर्वात महत्त्वाची आणि कठीण चाचणी चढाच्या रस्त्यावर घेतली जाते. यामध्ये ६० अंशाच्या चढावर मोटार नेऊन मध्येच ती बंद करायची आणि त्यानंतर चढावरच ती पुन्हा सुरू करून पुढे न्यायची. याच चाचणीचा चालक धसका घेतात आणि त्यातच अनेकजण नापास होत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे चाचणी मार्गावर मानवी हस्तक्षेप नाही. मार्गावर बसविलेल्या ‘सेन्सर’च्या मदतीने संगणकाकडूनच संबंधिताला गुण दिले जातात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button