breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

भाजपच्या माजी मंत्र्याची गळफास घेऊन आत्महत्या

छत्तीसगडचे भाजपचे माजी परिवाहन मंत्री रजिंदरपाल सिंग भाटिया यांनी राहत्या घरी गाळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रजिंदरपाल सिंग यांच्या आत्महत्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

छत्तीसगड येथील खुज्जी विधानसभा मतदारसंघातून राजिंदरपाल सिंग भाटिया तीन वेळा आमदार राहिले आहेत. रमन सिंह सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांना मंत्रिपद देण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना मत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. त्यानंतर त्यांनी सीएसआईडीसीचे चेअरमनपद भूषावलं.

मिळालेल्या माहितीनुसार, रजिंदरपाल सिंग भाटिया लहान भावासोबत छुरिया येथे राहत होते. रविवारी सांयकाळी ते एकटेच घरी होते. कुटुबांतील सदस्य जेव्हा घरी पोहचले तेव्हा ते गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आले. त्यानंतर पोलिसांना तात्काळ कळवण्यात आलं. पोलिसांनी या प्रकराणाचा तपास सुरु केला आहे. पोलिसांना त्याठिकाणी कोणताही सुसाइड नोट सापडलेली नाही. त्यामुळे रजिंदरपाल सिंग यांच्या आत्महत्येमागील कारण अस्पष्ट आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, रजिंदरपाल गेल्या काही दिवसांपासून आजारी होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button