Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

एकच चर्चा! उर्मिला मातोंडकरांनी खरेदी केले कोट्यवधींचे ऑफिस

उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेने प्रवेश केला. यानंतर चर्चा सुरू झाली ती त्यांच्या नव्या कार्यलयाची. शिवसेनेच प्रवेश केल्यानंतर उर्मिला यांनी काही आठवड्यांतच यांनी मुंबईच्या प्रसिद्ध भागात एक नवं ऑफिस खरेदी केलं आहे.

मुंबई मिररच्या वृत्तानुसार 2020 या वर्षाच्या अखेरीसच या जागेचा अंतिम व्यवहार करण्यात आला. जवळपास 1000 चौरस फुटांची ही जागा मोक्याच्याच ठिकाणी आहे. मुंबईतील खार पश्चिम भागात असणाऱ्या लिंकिंग रोड इथं त्यांच्या ऑफिसची इमारत आहे. शिवाय इथं कार्यालयीन जागांसाठी दरमहा 5-8 लाख रुपये इतकं भाडं आकारलं जातं, अशीही माहिती समोर येत आहे.

उर्मिला यांचं नवं ऑफिस इथं सहाव्या मजल्यावर आहे. एका व्यावसायिकाकडून त्यांनी या जागेची खरेदी केली असून, यासठी तब्बल 3.75 कोटी इतकी मोठी रक्कम मोजल्याचं म्हटलं जात आहे.

विधानपरिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 सदस्यांमध्ये शिवसेनेने आपल्या कोट्यातून उर्मिला मातोंडकर यांना आधीच उमेदवारी दिली होती. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. यात भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला होता. या पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून उर्मिला मातोंडकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button