breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

विद्यार्थी प्रवेश घेण्यास इच्छुक नसल्याने मराठवाडा विद्यापीठातील ११ अभ्यासक्रम बंद

औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी प्रवेश घेण्यास इच्छुक नसल्याने ११ अभ्यासक्रम कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. विद्यापीठाच्या ६३व्या वर्धापनदिनी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीत व्यवस्थापन परिषदेने यावर शिक्कामाेर्तब केले. यातील काही विभाग इतर विभागात विलीन केले आहेत. तर ५ शैक्षणिक वर्षांमध्ये क्षमतेपेक्षा कमी प्रवेश झालेले अभ्यासक्रम बंद केले आहेत. विभागप्रमुखांनी यापूर्वी अनुमती दिल्याने व्यवस्थापन परिषदेत ११ अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

कायमस्वरूपी बंद करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांमध्ये एमएससी (मॅथेमॅटिक्स), एमटेक इंजिनिअरिंग (कॉम्प्युटर सायन्स अ‍ँड इंजिनिअरिंग), डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट (डीबीएम), सर्टिफिकेट कोर्स ऑफ प्रोफीसेन्सी एन रशियन, बीए इंटरनॅशनल (जर्नालिझम अ‍ँड आर्ट अ‍ँड सायन्स युनिस्को कोर्स), बीएड, एमएड इंटिग्रेटेड कोर्स, डिप्लोमा इन टीव्ही प्रोडक्शन अ‍ँड बेसिक फिल्म मेकिंग, बॅचलर ऑफ डान्स, बीए (म्युझिक), बॅचलर ऑफ प्रिंटिंग टेक्नॉलॉजी अ‍ँड ग्राफिक्स आर्ट (बीपीटी अ‍ँड जीए), एमएससी नॅनो टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. तर काही अभ्यासक्रमांच्या प्रवेश क्षमता कमी करण्याबरोबरच अन्य अभ्यासक्रमांत विलीन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button