पिंपरी / चिंचवड

दुचाकी चोरणा-या दोघांना अटक : पाच दुचाकी जप्त

महाळुंगे पोलिसांची कारवाई

पिंपरी l प्रतिनिधी

महाळुंगे पोलिसांनी दुचाकी वाहने चोरणा-या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन लाख 15 हजारांच्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे महाळुंगे पोलीस चौकीतील तीन, चाकण आणि दिघी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.

अक्षय प्रभाकर कणसे (वय 24, रा. कुरुळी, ता. खेड. मूळ रा. लातूर), योगेश मोहन सूर्यवंशी (वय 26, रा. कुरुळी, ता. खेड. मूळ रा. लातूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी माहिती दिली. शहरात सुरु असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी महाळुंगे पोलीस गस्त घालीत होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग हे त्यांच्या पथकासह गस्त घालत असताना त्यांना चिखली-मोई रस्त्याने दोन तरुण दुचाकीवरून संशयितरीत्या येताना दिसले. दुचाकीला समोरील बाजूची नंबर प्लेट नव्हती. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला मात्र दोघे न थांबता पळून जाऊ लागले. पोलिसांनी दुचाकीस्वाराचा पाठलाग केला आणि दोघांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी ती दुचाकी गायकवाड वस्ती कुरुळी येथून 10 मार्च रोजी चोरी केल्याचे सांगितले. त्यांनतर दोघांना अटक करून आणखी चौकशी केली असता त्यांनी आणखी चार दुचाकी चोरल्याचे सांगितले. दोघांच्या ताब्यातून दोन लाख 15 हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

या कारवाईमुळे महाळुंगे पोलीस चौकीत दाखल असलेले तीन, चाकण आणि दिघी पोलीस ठाण्यात दाखल असलेले प्रत्येकी एक असे एकूण पाच दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. एमआयडीसी मधील कामगारांच्या दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण अधिक असल्याने कामगारांनी आपल्या दुचाकी कंपनीच्या आवारात कंपाउंडच्या आत सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्हीच्या निगराणीखाली पार्क कराव्यात. दुचाकीला मेटल टायर लॉक लावावे. हॅंन्डल लॉक करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दशरथ वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, उपनिरीक्षक किरण शिंदे, पोलीस हवालदार राजू कोणकेरी, अमोल बोराटे, गोरख गाडीलकर, अशोक जायभाये, पोलीस नाईक संतोष काळे, युवराज बिराजदार, किशोर सांगळे, अजय गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी लोखंडे, बाळकृष्ण पाटोळे यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button