breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आधुनिक काळातील मशनरी बाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्या – अभय भोर

फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनची केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी

पिंपरी | प्रतिनिधी

आधुनिक काळातील मशनरी बाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) आणि स्किल डेव्हलपमेंट विभागामार्फत पुढाकार घ्यायला हवा. आधुनिक काळातील मशनरी बाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिल्यास उद्योग वाढीला चालना मिळेलं. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडे निवेदनाद्वारे हि मागणी केली आहे.  

निवेदनात नमूद केले आहे की, तरुण-तरुणींना उच्च तंत्रज्ञानावर आधारित मशनरीचे प्रशिक्षण दिले तरच महाराष्ट्रातील तरुण आधुनिकीकरणाला सामोरे जाऊ शकतात. अन्यथा मोठ्या प्रमाणात बेकारीचा सामना करावा लागेल. सध्याच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांमध्ये असे अनेक कोर्स आहेत. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना होत नाही. डिझेल इंजिन मेकॅनिक कोर्स आहेत. मात्र डिझेलवर आधारित वाहने बंद होत आहेत. येणाऱ्या काळात इलेक्ट्रिकल वाहनाचे जग पाहता अजूनही औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये तसे प्रशिक्षण देण्याची सोय उपलब्ध नाही. सर्वसामान्य वर्गातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शुल्क देऊन हा अभ्यासक्रम करू शकत नाही. सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी विशेषतः ग्रामीण भागात सरकारने आपल्या शिक्षणामध्ये बदल करून संबंधित संस्थांमध्ये तसे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. येणारा काळ हा रोबोटिक मशनरी वर आधारित आहे. अनेक ठिकाणी त्याची सुरुवात देखील झालेली आहे. यावेळी महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना जर अत्याधुनिक तंत्र शिक्षण मिळाले नाही, तर परराज्यातील तरुणांकडे रोजगार जाईल. महाराष्ट्रावर बेरोजगारीची मोठी कुर्‍हाड कोसळेल.

या परिस्थितीचा विचार करून सध्याच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल करून सरकारने व्यवस्थापन करावे. तसेच आधुनिक मशीनबाबत असणारे कोर्स सुरु करावेत, अशी मागणी अभय भोर यांनी केली.

फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीजचा पुढाकार –

फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीजच्या वतीने आधुनिक मशिनरी बाबत प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दुर्गा भोर यांच्या मार्फत तरुण तरुणींना एकत्रित करून अत्याधुनिक मशिनरी बाबत जनजागृती केली जात आहे. भविष्यात असे कोर्सेस सुरु करण्यासाठी त्यांच्याकडून पाठपुरावा सुरु असल्याची माहिती अभय भोर यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button