breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद; दहा जखमी

छत्तीसगड |

छत्तीसगडमधील बिजापूर येथील तारेम जवळच्या जंगलात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाले असून, दहा जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. छत्तीसगडचे डीजीपी डीएम अवस्थी यांनी याबाबत माहिती दिली आहे. शहीद जवानांमध्ये डीआरजी व सीआरपीएफच्या जवानांचा समावेश आहे. या अगदोर छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात मंगळवारी नक्षलवाद्यांनी घडविलेल्या भूसुरुंग स्फोटात पाच पोलीस शहीद झाले, तर १४ जण जखमी झाले होते.

जिल्हा राखीव पोलीस दलातील २० कर्मचारी मंगळवारी नक्षलवादविरोधी मोहीम आटोपून खास बसद्वारे नारायणपूरकडे परतत होते. कदेनार आणि कान्हरगावदरम्यान नक्षलवाद्यांनी भूसुरूंग स्फोटाद्वारे ही बस उडवली. त्यात चालकाबरोबरच पाच पोलीस शहीद झाले, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक (बस्तर परिमंडळ) सुंदरराज पी. यांनी दिली आहे.

वाचा- अमेरिकेच्या कॅपिटॉलमध्ये लॉकडाउन जाहीर, वाहनाने दोन पोलीस अधिकाऱ्यांना चिरडलं; एकाचा मृत्यू

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button