breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात कोरोनाचे तीन नवे संशयित रुग्ण, एकूण संशयितांची संख्या आठवर

पुणे | पुण्यामध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्याची शक्यता असलेले तीन नवे रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आहेत. पण त्यांना हा आजार झाला आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राज्य सरकारच्या आरोग्य खात्याकडून ही माहिती देण्यात आली. हे तीन रुग्ण पुरुष असून, ते बीजिंग किंवा शांघायमधून काही दिवसांपूर्वी परतले आहेत.

पुण्यात कोरोनाची लागण झाल्याचा संशय असलेल्या चार रुग्णांवर पुणे महापालिकेच्या नायडू रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्व रुग्णांना रुग्णालयात स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. रविवारी या आजाराची लक्षणे आढळलेल्या तीन रुग्णांपैकी एकाचे वय ४२ आहे. ही व्यक्ती १५ ते १८ जानेवारी या काळात शांघायमध्ये प्रवास करीत होती.

दुसरी व्यक्ती ३० वर्षांची आहे. ही व्यक्ती २८ डिसेंबर ते २२ जानेवारी या कालावधीत बीजिंगमध्ये होती. तिसरी व्यक्ती २७ वर्षांची असून, ती ५ ते २५ जानेवारी या कालावधीत शांघायमध्ये होती. या सर्व रुग्णांमध्ये ताप, घसा दुखणे, खोकला आणि सर्दी अशी लक्षणे आढळली आहेत. या सर्वांना नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button