breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

करोना उद्रेक! मृतदेहांचा लागला ढीग; अंत्यसंस्कारालाही मिळेना जागा

मुंबई |

करोनामुळे काही ठिकाणची परिस्थिती बिकट होत असल्याचं दिसत आहे. विषाणू वैगानं फैलावत असतानाच काही ठिकाणी मृतांची संख्याही वाढत आहे. छत्तीसगढमधील दुर्ग जिल्ह्यातही परिस्थिती चिंताजनक झाली आहे. दुर्ग जिल्ह्याला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला असून, स्मशानभूमीबाहेर मृतदेहांचा ढीग लागला आहे. अवघ्या सात दिवसात ३८ जणांचा करोनाने बळी घेतला आहे. छत्तीसगढमधील दुर्ग जिल्हा करोनामुळे सर्वाधिक प्रभावित झाला असून, गेल्या काही दिवसांपासून मृत्यूची संख्याही वाढली आहे. करोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या अचानक वाढल्याने स्मशानभूमी आणि दफनभूमीत सध्या जागा उपलब्ध होत नाहीये. आधी दोन ठिकाणी मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात होते. मागील दोन दिवसात मृतांची संख्या वाढली. अनेक मृतदेह स्मशानभूमीत आणण्यात आले आहेत. त्यामुळे २-३ ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असं दुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

वाढत्या करोना संक्रमणामुळे दुर्ग जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ६ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीमध्ये लॉकडाउन लागू केला जाणार आहे. दुसरीकडे ५०० बेडची व्यवस्था असलेल्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टर नातेवाईकांकडे मृतदेह सोपवण्यास असमर्थ ठरत असून, सध्या जिल्हा रुग्णालयात असलेल्या शवागारातील ८ फ्रीजमध्ये २७ मृतदेह ठेवण्यात आलेले आहेत. एनडीटीव्हीनं त्यांच्या वृत्तात ही माहिती दिली आहे.

वाचा- अमेरिकेच्या कॅपिटॉलमध्ये लॉकडाउन जाहीर, वाहनाने दोन पोलीस अधिकाऱ्यांना चिरडलं; एकाचा मृत्यू

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button