breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘पहिला डोस राज्यसभेचा, दुसरा डोस विधान परिषदेचा, आता बूस्टर डोसची तयारी’- आमदार प्रा. राम शिंदे

अहमदनगर : शिवसेनेतील दिग्गज नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. आता राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याबाबत भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने आणि आमदाराने मोठं वक्तव्य केलं आहे. विधान परिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. पहिला डोस हा राज्यसभेचा होता, दुसरा डोस विधान परिषदेचा होता. तर आता तिसऱ्या बूस्टर डोससाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असं राम शिंदे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ वर्षात केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम करून निर्विवादपणे भाजपचे वर्चस्व निर्माण करावे, असे आवाहन शिंदे यांनी केले.

भाजप आता राज्य सरकारला बूस्टर डोस देण्याच्या तयारीत आहे. यामुळे जिल्ह्यात आता कोणी पक्ष सोडून जाणार नाही. आपल्या जिल्ह्यातील दोन जिल्हा परिषद सदस्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता ते तोंडावर आपटले असतील. येत्या काळात भाजपचे पूर्ण ताकदीने राज्यात सरकार येणार आहे, असं मोठं वक्तव्य राम शिंदे यांनी केलं. राज्यात आणि देशात जेव्हा केव्हा पोटनिवडणुका होतात तेव्हा भाजपचे सरकार पुन्हा येताना दिसतंय. नगर जिल्ह्यात यापेक्षा वेगळं वातावरण राहणार नाही. आणखी एक आमदार जिल्ह्यात वाढणार आहे. आता चार आमदार झाले आहेत. पक्ष नेतृत्वाने घेतलेला निर्णय आपल्याला उपयोगात आणायचा आहे. जेष्ठ नेते प्राध्यापक राम शिंदे यांची विधान परिषदेवर निवड होऊन आमदार झाल्याबद्दल अहमदनगर जिल्हा भाजपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, मार्गदर्शन व नियोजन, बैठकीच्या कार्यक्रम प्रसंगी राम शिंदे बोलत होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button