ताज्या घडामोडीमुंबई

वीजग्राहकांची आर्थिक फसवणूक, एकास अटक ; महावितरणचे बनावट संकेतस्थळ

आरोपीने बनावट संकेतस्थळ तयार करून ग्राहकांना खोटे संदेश पाठवून वीज बिल भरण्यास सांगितले होते.

मुंबई | महावितरण कंपनीचे बनावट संकेतस्थळ तयार करून वीज देयक भरण्यासंदर्भात ग्राहकांना संदेश पाठवून फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. चरकू खुबलाल मंडल असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा झारखंडच्या देवघरच्या दरबे गावचा रहिवाशी आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चार मोबाईल आणि एक सिमकार्ड जप्त केले आहे.

आरोपीने बनावट संकेतस्थळ तयार करून ग्राहकांना खोटे संदेश पाठवून वीज बिल भरण्यास सांगितले होते. संदेश खरा समजून काहींनी वीज बिल भरले होते. मात्र फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच ग्राहकांनी महावितरणकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर महावितरणने सायबर पोलिसांत तक्रार केली. २० जानेवारीला या तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी बनावट दस्तावेजाच्या आधारे फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. पोलिसांनी तांत्रिक माहितीवरुन झारखंड येथून चरकू मंडल या २७ वर्षांच्या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच हे बनावट संकेतस्थळ तयार केल्याचे कबुल केले. दोन वर्षांपूर्वी त्याला अशाच गुन्ह्यांत फरीदाबाद पोलिसांनी अटक केली होती. ऑगस्ट २०२१ तो जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर त्याने जानेवारी २०२२ मध्ये हे बनावट संकेतस्थळ बनविल्याचे निष्पन्न झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button