breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारचे मोठे निर्णय

कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या ४ वर पोहोचल्यानंतर आता मोदी सरकारनं महत्त्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केलीय. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्रानं आज सहा मोठे निर्णय घेण्यात आले आहेत…

काय आहेत ते 6 मोठे निर्णय

1..देशात आतापर्यंत कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींचं वयोमान ६० पेक्षा अधिक आहे.  या पार्श्वभूमीवर ६०च्या पुढे वय असणा-या व्यक्तींनी घराबाहेर पडू नये, अशा सूचना केंद्राकडून देण्यात आल्या आहेत.

2… विमान सेवेवरही कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत.

3… १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनीदेखील घरीच राहावं, अशा सूचना केंद्राकडून देण्यात आल्या आहेत. लहान मुलांची आणि ज्येष्ठांची रोगप्रतिकार क्षमता कमी असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय.

4…रेल्वे आणि विमान प्रवासादरम्यान मिळणाऱ्या सर्व सवलती रद् करण्यात आल्या आहेत.

5…मात्र विद्यार्थी, रुग्ण आणि दिव्यांगांना या नियमांतून वगळण्यात आलंय. 

6… येत्या २२ मार्चपासून परदेशांमधून येणारी विमानं भारतीय विमानतळांवर उतरू दिली जाणार नाहीत. ही बंदी एक आठवड्यासाठी लागू असणार आहे. परदेशांमधून येणाऱ्या व्यक्तींमुळेच देशात कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या घटना घडल्याचं आकडेवारीतून समोर आलंय. त्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतलाय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button