ताज्या घडामोडीपुणे

शेवटी संदीपच्या बायकोने पोलिसांना फ्रीज पण उघडून दाखवला की तो नाहीये घरात

पुणे|मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात महाविकास आघाडी सरकार, शरद पवार, शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी त्यांच्या अयोध्या दौरा स्थगित करण्याची कारणंही सांगितली. तर भोंगे आंदोलनावरूनही त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. जे कायदा पाळा सांगतात त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात आणि जे कायदा पाळत नाहीत त्यांच्यासोबत तुम्ही चर्चा करता, माझ्या २८ हजार महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे दाखल करता, असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारला सुनावलं. तर, संदीप देशपांडेंना पाकिस्तान बॉर्डर क्रॉस करून आल्यासारखं पोलीस शोधत होते, असा खोचक टोलाही राज ठाकरेंनी लगावला.

संदीप देशपांडेंना पाकिस्तान बॉर्डर क्रॉस करून आल्यासारखं पोलीस शोधत होते – राज ठाकरे

“भोंग्याच्या प्रकरणात २८ हजार महाराष्ट्र सैनिकांना नोटीसा गेल्या. जो कायदा पाळा म्हणतोय त्याच्यावर गुन्हा दाखल होतो, अटक करणार, नोटीसा पाठवल्या जाणार आणि जो कायदा पाळत नाही त्यांच्याबरोबर चर्चा करणार. आमचे संदीप देशपांडे यांना जवळपास पाकिस्तान बॉर्डर क्रॉस करून आल्यासारखे पोलीस शोधत होते. शेवटी संदीपच्या बायकोने फ्रीज पण उघडून दाखवला, अहो नाहीये घरात म्हणून”, असं म्हणत राज ठाकरेंनी ठाकरे सरकारचा समाचार घेतला.

मनसेचे नेते का झाले होते गायब?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांना विरोध करत ४ मे रोजी पक्षातील कार्यकर्त्यांना मशिदीसमोर हनुमान चालिसा लावण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यभरात पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केली. याचदिवशी शिवाजी पार्क येथे पोलीस ताब्यात घेत असताना संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी आपल्या खासगी वाहनातून पोलिसांसमोरच पळ काढला. यावेळी झालेल्या गोंधळात एक महिला पोलीस कर्मचारी रस्त्यावर पडून जखमी झाली. त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या या दोन्ही नेत्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून गायब असणारे मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना अखेर दिलासा मिळाला. या दोन्ही नेत्यांना सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. मात्र, यादरम्यान पोलिसांनी अनेक ठिकाणी त्यांचा शोध घेतला.

मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरींना जामीन मंजूर; विशेष सरकारी वकील प्रदीप घरत म्हणाले

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button