ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विक्रीसाठी बायोडिझेल वाहतूक ; आरोपी अटकेत, 72 लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी चिंचवड | विक्रीसाठी चोरुन बायोडिझेल वाहतूक करणाऱ्या आरोपींना चाकण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या कडून 22.69 लाख रुपये किंमतीचे बायोडिझेल आणि 50 लाख रुपये किंमतीचे दोन ट्रक असा एकूण 72.69 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शेलपिंपळगावच्या हद्दीत चाकण शिक्रापूर रोडवरती शुक्रवारी (दि.11) पहाटे तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

राजू ज्ञानदेव गिते (वय 28), विठ्ठल भानुदास सोनवणे (वय 33) (दोघेही रा. आष्टी, बीड), कंटेनर मालक निवृत्ती भानुदास गर्जे (रा. ठाणे), ब्रोकर विठ्ठल म्हस्के (रा. न्हावा शेवा) आणि बायोडिझेल वाहतूक व साठवणूक करणारे इतर लोकांना अटक करण्यात आली आहे.

अन्न धान्य वितरण अधिकारी, पुरवठा निरीक्षक गणेश सुभाष रोखडे (वय 44) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रतिबंधित बायोडिझेल विक्री साठी घेऊन जात होते. दोन्ही ट्रकची पडताळणी केली असता त्यात 22.69 लाख रुपये किंमतीचे 37 हजार 830 किलो ग्रॅम बायोडिझेल आढळून आले. पोलिसांनी MH 43 Y 3575 व MH 43 Y 3569 असे दोन्ही ट्रक जप्त केले आहेत. कारवाईत एकूण 72.69 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button