TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमुंबईराजकारण

औरंगाबादमधील सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या गर्दीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल

मुंबई: औरंगाबादमधील सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या गर्दीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. औरंगाबादच्या जिल्हा न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर पोलिसांनी यासंदर्भात राज ठाकरे यांना नोटीसही पाठवली आहे. त्यामुळे आता राज ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज ठाकरे यांनी १ मे रोजी औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेतली होती. सुरुवातीला पोलिसांनी या सभेला परवानगी नाकारली होती. त्यामुळे मनसे आक्रमक झाली होती. अखेरच्या क्षणाला पोलिसांनी या सभेला १६ अटींसह सशर्त परवानगी दिली होती. यामध्ये मैदानात जमणाऱ्या लोकांच्या संख्येवर निर्बंध लादण्यात आले होते. परंतु, हे सर्व निर्बंध पायदळी तुडवत मनसैनिकांनी हजारोंच्या संख्येने या सभेला गर्दी केली होती. त्यामुळे ही सभा झाल्यानंतर पोलिसांनी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. तसेच राज ठाकरे यांचे भाषणही पोलिसांकडून तपासण्यात आले होते.

या सभेत राज ठाकरे यांनी चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप होता. पोलिसांनी मनसेच्या सभेसाठी आवाजाची आणि गर्दीची मर्यादा घालून दिली होती. परंतु, राज ठाकरे यांनी हे सर्व निर्बंध झुगारून दिले होते. त्यामुळे सायबर पोलिसांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचे फुटेज तपासून तो अहवाल गृहमंत्रालयाकडे पाठवला होता. गृहमंत्रालयात चर्चा झाल्यानंतर राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्यात आला. त्यानुसार, औरंगाबाद सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता पोलिसांनी न्यायालयात राज ठाकरे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.

राज ठाकरे म्हणाले, सोशल मीडियावर पक्षाविरोधात कमेंट कराल तर एका क्षणात पक्षातून हाकलून देईन…

आता भारत नाही तर ‘हिंदूंचा हिंदुस्थान’
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. राज्य ठाकरे यांचा हस्ते आज मनसेच्या सदस्य नोंदणी मोहीमेला प्रारंभ झाला. मनसे कार्यकर्त्यांनी हिंदूंचा हिंदुस्थान असा उल्लेख करणारा पोस्टर झळकावला आहे. आज पुण्यात राज ठाकरेच्या पोस्टरवर आता भारत नाही तर हिंदूंचा हिंदुस्थान,हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी हिंदू जननायक, असे पोस्टर सगळ्यांचा चर्चेचा विषय ठरत आहे. आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसेची पक्ष बांधणी सुरू झाली आहे. राज ठाकरे यांची जाहीर सभा नुकतीच मुंबईत पार पडली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button