पिंपरी / चिंचवड

गुरुपौर्णिमेनिमित्त च-होली साई मंदिरात माध्यान्ह आरतीला भाविकांची गर्दी

पिंपरी – गुरूपौर्णिमेनिमित्त पुणे-आंळदी रस्त्यावरील च-होली येथील श्री साई मंदिरात श्री साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नेलगे व विश्वस्त शिवकुमार नेलगे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 27) दुपारी 12 वाजता भक्तीपुर्ण वातावरणात श्रींची माध्यान्ह आरती करण्यात आली. यावेळी पुणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त तुषार दौंडकर आणि हजारो भक्त भाविक उपस्थित होते.

 

गुरुपौर्णिमेनिमित्त श्री साई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शुक्रवारी पहाटे 5 वाजता श्रींची काकड आरती, मंगलस्नान, साई चरित्र अखंड पारायण प्रारंभ, श्रींचा रुद्राभिषेक, साई भजन माला, 7 वाजता धूपआरती, सायंकाळी साडेसात ते दहा यावेळेत श्री साई भजनमाला, सकाळी दहा  वाजता भिक्षा झोळी. यानंतर दुपारी बारा वाजता श्रींची माध्यान्ह आरती मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या भक्ती भावाने करण्यात आली. भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. दुपारी साई भक्ति संगीताचा कार्यक्रम घेण्यात आला. रात्री अकरा वाजता हरी जागर कार्यक्रम झाला. शनिवारी सांगता समारोपानिमित्त सकाळी नऊ वाजता श्री साई भजन, अकरा वाजता गोपाळकाला (दहिहंडी), दुपारी बारा वाजता श्रींच्या माध्यान्ह आरतीने महोत्सवाचा समारोप होईल.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button