ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महिला पोस्टमनला दोन महिलांकडून चप्पलने मारहाण, गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड | पत्र वाटपासाठी आलेल्या महिला पोस्टमनला दोन महिलांनी चप्पलने मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी या दोन महिलांविरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निगडी प्राधिकरण येथे शुक्रवारी (दि.28) दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी महिला पोस्टमनने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला पोस्टमन पत्र वाटपाचे काम करीत होत्या. प्राधिकरण येथे आरोपी महिला व तिची मुलगी यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली व लाथा बुक्या घालत चप्पलने मारहाण केली.सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी या दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button