breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

थेरगाव आणि आकुर्डीतील पालिकेच्या रुग्णालयाची आयुक्त व महापौरांनी केली पाहणी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोनाबाधीत रुग्णांची वाढती रुग्णसंख्या पाहता त्यांना उपचार देण्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी थेरगाव आणि आकुर्डी येथील महापालिकेच्या रुग्णालयांची आज पाहणी केली.

त्यांच्यासोबत पक्षनेते नामदेव ढाके, प्रभागातील नगरसेवक तथा अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, नगरसेविका अर्चना बारणे, नगरसेवक अभिषेक बारणे, सामाजिक कार्यकर्ते तानाजी बारणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, शहर अभियंता राजन पाटील आदी उपस्थित होते. थेरगाव येथे उभारण्यात येत असलेल्या नवीन रुग्णालयाच्या चार मजली इमारतीची पाहणी केली. या रुग्णालयात 200 बेड्सची व्यवस्था करण्याचे नियोजित आहे. तर, आकुर्डीतील रुग्णालयात 100 बेड्सची व्यवस्था करण्यात येणार आहे. इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. याठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्याचे आयुक्तांच्या विचाराधीन आहे.

गटनेते कैलास बारणे म्हणाले, संपूर्ण शहरावर कोविड 19 चे संकट आहे. या संकटातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आरोग्य वैद्यकीय यंत्रणा सक्षमपणे कार्यरत झाली पाहिजे. या रुग्णालयामध्ये रुग्णांना उत्तम प्रकारे वैद्यकीय सेवा देण्याकरिता यंत्रणा सक्षम ठेवण्याची सूचना केली. त्याला महापौर आणि आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

नगरसेविका अर्चना बारणे म्हणाल्या, याठिकाणी कोविड सेंटरसोबतच डायग्नोस्टिक सेंटर आणि ओपीडी सुरू करण्यात यावी. कोविड बाधित रुग्णांबरोबरच अन्य प्रकारची तपासणी करण्यासाठी येणा-या रुग्णांना देखील याठिकाणी उपचार मिळाले पाहिजेत. रुग्णसेवा सुरू करण्यापूर्वी तज्ञ डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी कार्यान्वीत करावेत. रुग्णालयात कर्मचा-यांची कमतरता भासू नये, याची काळजी घ्यावी.

पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, सध्या कोरोनाबाधीत रुग्णांची वाढती संख्या पाहता कोविड सेंटरची कमतरता भासत आहे. त्यामुळे महापालिकेच्या नियोजित रुग्णालयांच्या इमारतीमध्ये कोविड सेंटर सुरू करण्याचा विषय आयुक्तांसोबत चर्चेस घेतला. त्यावर आयुक्तांनी सुध्दा तातडीने भूमिका घेऊन थेरगाव आणि आकुर्डीतील रुग्णालयाची पाहणी करण्याची तयारी दाखविली. आज दोन्ही रुग्णालयांची पाहणी करून त्याठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली. येत्या महिनाभरामध्ये प्रलंबित काम मार्गी लावून त्याठिकाणी लवकरात लवकर कोविड सेंटर कसे तयार करता येईल, यासंदर्भात आयुक्त हे अधिकारी आणि कर्मचा-यांना आदेश देतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button