आरोग्यताज्या घडामोडीपुणे

चोवीस तासांत 871 कोरोना रुग्ण दगावले, 2.35 लाख नव्या रुग्णांची वाढ

पुणे | गेल्या 24 तासांत देशात नव्यानं वाढ झालेल्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. चोवीस तासांत 2 लाख 35 हजार 532 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 871 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशातील कोरोनाची सद्यस्थिती जाणून घेऊया दहा मुद्यांमध्ये.

1. देशात सध्या 20.04 लाख ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

2. गेल्या 24 तासांत 3 लाख 35 हजार 939 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे..

3. ICMR च्या आकडेवारीनुसार आजवर देशात 72.57 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 17.59 लाख चाचण्या पार पडल्या.

4. देशाचा रिकव्हरी रेट 93.89 टक्के एवढा झाला आहे.

5. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 13.39 टक्के एवढा झाला आहे.

6. कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम अंतर्गत 165.04 कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

7. देशात आजवर 4 लाख 93 हजार 198 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

8. सध्या महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये सर्वाधिक ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.

9. देशाचा आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट 16.89 टक्के झाला आहे.

10. देशात आजवर 43.61 लाख जेष्ठ नागरिकांनी लसीचा प्रिकॉशनरी डोस घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button