पिंपरी चिंचवड | माथाडी कामगाराला मारहाण करून 15 हजार रुपये खंडणी घेतली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत प्रत्येक गाडी मागे 15 हजारांची मागणी केली. गोदरेज प्रापर्टी साईट, मामुर्डी येथे शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.याप्रकरणी सुमित अरुण रावत (वय 29, रा. मामुर्डी) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाबा चव्हाण, सोमनाथ गडदे आणि नविन (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे भैरवनाथ महाराज व्यावसायिक मथाडी संघटनेला मिळालेल्या करारानुसार ट्रक घेऊन साईटवर खाली करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी यांनी फिर्यादी यांचा ट्रक अडवून त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच जबरदस्तीने 15 हजार रुपये घेतले.कंपनीत खाली होणा-या प्रत्येक गाडी मागे 15 हजार रुपये दिले तरच गाडी खाली करु देईन अन्यथा नाही अशी धमकी दिली. असे फिर्यादीत नमूद केले आहे. देहुरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.