breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

परदेशातून शहरात येणा-यांना विमानतळावरच क्वारंटाईन करा

  •  महापौरांची प्रशासनाला सूचना
  •  मेळाव्याला परवानगी नाही; आयुक्तांची माहिती

पिंपरी | प्रतिनीधी

कोरोनाचा नवीन विषाणू असलेल्या ‘ओमायक्रॉन’चा पिंपरी-चिंचवड शहरात प्रसार होऊ नये यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्याकरिता परदेशातून पिंपरी-चिंचवड शहरात येणा-यांना विमानतळावरच 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करावे, अशी सूचना महापौर उषा ढोरे यांनी प्रशासनाला केली.

परदेशातून शहरात आलेल्या 3 आणि त्यांच्या संपर्कातील अशा 6 जणांना ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग झाला आहे. एकाचदिवशी 6 रुग्णांना संसर्ग झाल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर महापालिका प्रशासनाने आज (सोमवारी) पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. महापौर उषा ढोरे, उपमहापौर हिरा घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे उपस्थित होते.

महापौर उषा ढोरे म्हणाल्या, कोरोनाच्या पहिला, दुस-या लाटेनंतर ओमायक्रॉनचे नवीन संकट आले आहे. शहर पुन्हा टेन्शनमध्ये आले आहे. ओमायक्रॉनला नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी. उपयायोजना हाती घ्याव्यात. नागरिकांनीही प्रशासनाकडून दिल्या जाणा-या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे.परदेशातून पिंपरी-चिंचवड शहरात येणा-या प्रत्येक नागरिकाला विमानतळावरच क्वारंटाईन करावे. सक्तीने त्यांना 14 दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवावे. कोरोनाची चाचणी निगेटीव्ह, कोणतीही लक्षणे नसली तरी त्यांना क्वारंटाईन करावे. जेणेकरुन ओमायक्रॉनचा शहरात प्रसार होणार नाही. त्यानुसार प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. त्यावर आयुक्त राजेश पाटील म्हणाले, सरकारकडून प्रोटोकॉला आला आहे. त्यामध्ये बदल करता येईल.

  • नियमांचे पालन करा ; आयुक्तांचे आवाहन

कोरोनाचा नवीन विषाणू असलेल्या ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग झालेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील 6 रुग्णांपैकी 1 रुग्णामध्ये सौम्य लक्षणे आहेत. तर, उर्वरित 5 रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. महापालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. नागरिकांनी पॅनिक होऊ नये. कोरोना प्रतिबंधात्मक लस, मास्क आणि सुरक्षित अंतर या त्रिसुत्रीचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी शहरवासीयांना केले.

  • मेळाव्यांना परवानगी नाही – आयुक्त

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा नवीन विषाणू असलेल्या ओमायक्रॉनची लागण झालेले 6 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे पुन्हा निर्बंध लागण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यावर महापालिका आयुक्त राजेश पाटील म्हणाले, पुढील परिस्थिती पाहून निर्बंधबाबत योग्य ते निर्णय घेतला जाईल. यापुढे मेळाव्यांना परवानगी दिली जाणार नाही.

  • परिस्थितीनुसार निर्बंधाबाबत निर्णय

ओमायक्रॉनमुळे पुन्हा नव्याने निर्बंध लागणार का असे विचारले असता आयुक्त पाटील म्हणाले, ओमायक्रॉनची लागण झालेले सहाही रुग्ण एकाच कुटुंबातील आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने सर्व निर्बंध शिथील केले होते. जनजीवन पूर्वपदावार आले होते. सर्व व्यवहार सुरळीत होते. नागरिकांनी घाबरुन जावू नये. लस घ्यावी, मास्कचा नियमित वापर करावा. सुरक्षित अंतराचे पालन करावे. पुढील परिस्थितीनुसार निर्बंधबाबत अवलंबून राहील. तुर्तास यापुढे मेळाव्याला परवानगी दिली जाणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button