breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमनोरंजनमहाराष्ट्र

TDM चं प्रदर्शन थांबवतोय!; दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचा निर्णय

पुणे : दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचा टीडीएम हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. हा सिनेमा चांगला असून देखील या चित्रपटासाठी थिएटरमध्ये शो मिळत नाहीत, अशी भावना भाऊराव कऱ्हाडे यांनी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी भाऊराव कऱ्हाडे यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भाऊसाहेब कऱ्हाडे यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्यांनी टीडीएम चित्रपटाच्या शोबाबत सांगितलं आहे. ‘माफ करा टीडीएम चं प्रदर्शन थांबवतोय! दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी हा निर्णय घेतला आहे. टीडीएमला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद, पण काही दिवसांपासून चित्रपटाला थिएटरमध्ये स्क्रिन उपलब्ध नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

परवापासून सगळ्या महाराष्ट्रात गोंधळ सुरू आहे, त्यावर मला बोलायचंय. मी प्रेक्षकांचे आभार मानतो, सोशल मीडियावरील लोकांचे आभार मानतो. त्यांनी हे प्रकरण पुढे आणलं. तुम्ही एका कलाकाराला न्याय देत आहात, त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. मी दिलगिरी देखील व्यक्त करतो कारण मी चित्रपटाचे शो थांबवले. त्यामुळे काही प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेले होते पण शो नसल्यानं परत आले. चित्रपटाला शो मिळत नसल्यानं माझ मनस्ताप झाला. त्यामुळे मी शो बंद केले आहेत, असं भाऊसाहेब कऱ्हाडे यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button