breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनराष्ट्रिय

प्रसिद्ध चित्रकार लक्ष्मण पै यांचे निधन

पणजी – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार लक्ष्मण पै यांचे निधन झाले आहे. ते ९५ वर्षांचे होते. रविवारी सायंकाळी गोव्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लक्ष्मण पै यांना पद्मभूषण, पद्मश्री, नेहरू पुरस्कार आणि ललित कला अकादमी पुरस्कार यांसारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.

लक्ष्मण पै यांचा जन्म २१ जानेवारी १९२६ रोजी गोव्यातील मडगाव येथे झाला होता. त्यांनी कलेचे शिक्षण मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून घेतले. त्यानंतर कलेच्या अधिक अभ्यासासाठी त्यांनी फ्रान्समध्ये दहा वर्षे वास्तव्य केले होते. त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भारतासह जगभरात आयोजित झालेली आहे. त्यांना भारत सरकारने १९८५ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. १९७७ ते १९८७ या काळात लक्ष्मण पै यांनी गोवा कॉलेज ऑफ आर्ट्सचे प्राचार्य म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर १९८७ मध्ये गोवा सरकारने त्यांना सन्मानित केले होते. पुढे भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित केले. 1995 मध्ये त्यांना नेहरू पुरस्कार देण्यात आला होता. लक्ष्मण पै यांना 1961, 1963 आणि 1962 तीन वेळा ललितकला अकादमी पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. पै यांनी पॅरिसमध्ये बराच वेळ घालवला असल्याने त्या गोष्टींचा त्यांच्या कलेवरही परिणाम होतो. मार्क चॅगल, पॉल क्ले आणि जोन मिरो यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. आर्ट गॅलरी डीएजीनुसार, त्यांची कला ही भारतीय लोक कलेच्या शैलीचे प्रदर्शन करते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button