breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आगामी पालिका निवडणुकीत मनसेला यश मिळणारच, रणजित शिरोळेंचा दावा

  • पालिका निवडणूकीत मनसेच प्रमुख पक्ष राहणार – सचिन चिखले
  • चिंचवड मतदारसंघात प्रभागनिहाय बैठकांचा धडाका  

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड शहर मनसेच्या वतीने आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रभागांची नुकतीच बैठक संपन्न झाली. यास बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष तथा पिंपरी-चिंचवड शहर मनसे प्रभारी रणजित शिरोळे यांनी उपस्थीत मनसैनिकांना मार्गदर्शन केले. तसेच प्रभागनिहाय नियुक्त्याही जाहीर केल्या.

चिंचवड मतदारसंघातील प्रभाग १६ रावेत, प्रभाग १७ चिंचवडेनगर, प्रभाग १८ चिंचवडगाव, प्रभाग २२ काळेवाडी, प्रभाग २९, ३१, ३२ परिसरात बैठकांचे सत्र आयोजित करण्यात आले होते. दरम्यान प्रभाग ३२ सांगवी उपविभाग अध्यक्षपदी मंगेश मोहन भालेकर, प्रभाग अध्यक्ष आशिष अशोक माने, शाखा अध्यक्षपदी रूस्तम रूजबे ईरानी, प्रभाग ३१ मध्ये अनिकेत भगवान बलकवडे याची शाखा अध्यक्षपदी तर प्रभाग २४ च्या प्रभाग अध्यक्षपदी संदेश पुरुषोत्तम सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी मनसे गटनेता तथा शहराध्यक्ष सचिन चिखले, उपशहराध्यक्ष राजू सावळे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष मयुर चिंचवडे, शहर उपाध्यक्ष विशाल मानकरी, शहर विद्यार्थी सेना अध्यक्ष हेमंत डांगे, जनहित कक्षाचे अध्यक्ष राजाभाऊ भालेराव, सचिव अनिकेत प्रभु, महिला अध्यक्षा अश्विनी बांगर, उपशहराध्यक्षा अनिता पांचाळ, मतदारसंघातील उपविभाग अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, संघटक व मनसैनीक उपस्थित होते.

रणजित शिरोळे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच विधानसभा मतदारसंघात प्रभागनिहाय बैठकांचे नियाेजन केले आहे. त्यानुसार विभागवार बैठका घेणे सुरू आहे. महापालिका निवडणुकीपर्यंत नियोजनासाठी बैठकांच्या सर्वात जास्त फेऱ्या करणार आहोत. विभागनिहाय व प्रभागनिहाय बैठकांमध्ये पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून प्रमुख मुद्यांवर चर्चा केली जात आहे. प्रत्येक बैठकीला मनसैनिकांची उपस्थिती लक्षणीय असते. या बैठकांची गर्दी पाहता पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत चांगले यश मिळणे निश्चित आहे. मात्र त्यासाठी मनसैनिकांनी जीवाचे रान करीत पक्षाचे ध्येयधोरणे जनतेपर्यत पोहोचविणे आवश्यक आहे.
————————-

”पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीला अवघे दहा महिने शिल्लक राहिले आहेत. गतवेळच्या महापालिका निवडणूक काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बऱ्यापैकी हवा होती व आताही आहे. आगामी महापालिका निवडणूकीत मनसे हाच कसा प्रमुख पक्ष होईल, यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. निवडणुकीपर्यंत राजकीय हालचालींमध्ये कमालीचा बदल झालेला दिसला पाहिजे. पदाच्या माध्यमातून पक्ष प्रत्येकाला बळकटी देतच आहे.”

सचिन चिखले, मनसे शहराध्यक्ष तथा गटनेता, पिं-चिं मनपा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button