TOP Newsमनोरंजन

हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री ’ तुनिषाला 10 दिवसांपूर्वी आला होता नैराश्याचा झटका’, काकांचा खुलासा

वसई ः हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्माने शनिवारी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. हिंदी वाहिनीवरील ‘दास्तान-ए-काबुल’ या मालिकेत ती मुख्य भूमिका साकरात होती. तिने मालिकेच्या सेटवरील मेकअप रुममध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. याचं प्रकरणात पोलिसांनी मालिकेतील सहकलाकार अभिनेता शीजान मोहम्मद खानला अटक केली आहे. दरम्यान, तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर तुनिषाचे काका पवन शर्मा यांनी या प्रकरणामध्ये एक खुलासा केला आहे. दहा दिवसांपूर्वी तुनिषा नैराश्येमध्ये गेली होती. प्रकृती अस्वस्थ्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तुनिषाचे काका पवन शर्मा यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, “10 दिवसांपूर्वी तुनिषा नैराश्येमध्ये गेली होती. प्रकृती अस्वस्थ्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा तिने तिच्यावर अन्याय झाल्याचे सांगितले असून, फसवणूक झाल्याचेही स्पष्ट केले होते” असं तिच्या काकांनी सांगितले. याशिवाय “तुनिषा आणि झिशान एकमेकांच्या जवळ होते”, असेही तिच्या काकांनी सांगितले.

दरम्यान, अभिनेत्री तुनिषा शर्माने वसईच्या कामन परिसरातील एका स्टुडिओमध्ये आत्महत्या केली. या घटनेनंतर ब्रेकअप झाल्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे याप्रकरणी मोठी कारवाई करत वालिव पोलिसांनी अभिनेत्री तुनिषा शर्माचा सहकलाकार शीजान खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी शीजानविरुद्ध भादंवि कलम 306 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तुनिषाच्या आईने शीजानवर हे आरोप केले आहेत. त्यामुळे पोलिसांनी रात्री उशीरा शीजानवर भारतीय दंड संहिता कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुनिषा शर्मा ही ‘दास्तान-ए-काबुल’ या मालिकेमध्ये काम करत होती. या मालिकेमध्ये ती मुख्य भूमिका साकारत होती. तुनिषा 20 वर्षांची होती आणि आतापर्यंत तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तुनिषा फितूर, बार बार देखो, कहानी 2: दुर्गा रानी सिंह, दबंग 3 यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसली होती. तुनिषाने पाच वर्षांपूर्वी आलेल्या ‘फितूर’ चित्रपटात छोट्या कतरिनाची भूमिका साकारली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button