पिंपरी / चिंचवड

मित्राच्या पत्नीसोबत बनावट अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

एका व्यक्तीचे आणि त्याच्या मित्राच्या पत्नीचे अश्लील फोटो बनवून ते सोशल मीडियावर पाठवून अज्ञात व्यक्तीने बदनामी केली. तसेच तीन व पाच हजार रुपये खंडणीची मागणी केली. ही घटना 1 ते 24 जानेवारी 2022 या कालावधी देहूरोड परिसरात घडली.

याप्रकरणी 39 वर्षीय व्यक्तीने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मोबाईल नंबरवर अज्ञात व्यक्तीने वेळोवेळी फोन करून तीन व पाच हजार रुपयांची मागणी केली. फिर्यादीने पैसे दिले नाहीत. त्यामुळे आरोपीने फिर्यादीच्या मित्राची पत्नी आणि फिर्यादी यांचा अश्लील फोटो एडिट केला. फिर्यादीच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील 15 नंबरवरील व्हाट्सअपवर फोटो पाठवून फिर्यादी यांची बदनामी केली. पैसे दिले नाहीत तर मी अजून तुमच्या मित्रांना तुमचे फोटो व्हायरल करील, अशी धमकीही आरोपीने दिली. पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button