breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

“रुपाली ताई, तुम्ही कुठे चंद्रकांत दादा कुठे..?”; भाजप नेत्या उमा खापरेंचं रुपाली चाकणकरांना प्रत्युत्तर

पुणे । प्रतिनिधी

पश्चिम बंगाल निवडणूक पार पडल्यानंतर या निवडणुकीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगल्याचे पाहायला मिळाली. या जुगलबंदीत उडी घेतली ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यांनी. रुपाली चाकणकर यांनी.

“चंद्रकांत पाटील यांना स्वत:च्या गावात ग्रामपंचायत निवडून आणता आली नाही. कोल्हापुरात महापौर बसवता आला नाही. या दैदिप्यमान कामगिरीमुळेच तुम्हाला कोल्हापूर सोडून पुण्यातील एका महिलेचा सुरक्षित मतदारसंघ निवडावा लागला, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करून केली होती.

तसेच जलयुक्त शिवार , चिक्की घोटाळा , मुंबई बँक घोटाळा ते PWD मधील प्रकरणे अशा अनेक घोटाळ्यांची चौकशी बाकी आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकांच्या आरोग्याचा विषय हा आमचा मुख्य मुद्दा आहे त्यामुळे आम्ही शांत आहोत. या दुष्टचक्रातून एकदा बाहेर पडलो की सगळ्या चौकशी होणार आहे. साधी आपली ग्रामपंचायत सुद्धा ज्यांना आपल्या ताब्यात ठेवता आली नाही अशा आमदार महोदयांनी मग्रूरपणा दाखवत इतरांशी बोलू नये.आपल्यातील बरेच नेते जामिनावरच बाहेर आहेत, थोडं मागे वळून पाहिलं तर आपला इतिहास आपल्या लक्षात येईल.  अशा शब्दात रुपाली चाकणकर यांनी चंद्रकांत पातळ्यांवर टीका केली होती.

मात्र रुपाली चाकणकर यांच्या या टीकेचं भाजपच्या महिला नेत्या उमा खापरे यांनी सडेतोड उत्तर देत रुपाली चाकणकर यांचा खरपूस समाचार घेतला आहे. “रुपाली ताई, तुम्ही कुठे चंद्रकांत दादा कुठे त्यांचा बद्दल बोलताय तुम्ही? याचा अर्थ म्हणजे जमिनीने आकाशाला हात लावावा  असा आहे. अशी मिश्कील टिप्पणी उमा खापरे यांनी केली.

तसेच त्या पुढे म्हणाल्या,”आमचे चंद्रकांत दादा हे कुठेही उभे राहू शकतात आणि कुठूनही निवडून येऊ शकतात. आमहाला त्यांचा अभिमान आहे. कुठेही निवडून यायची ताकद आहे त्यांच्यात. अहो, रुपाली ताई तुम्ही तर साधी महानगरपालिकेची निवडणूक जिंकू नाही शकलात आणि तुम्ही चंद्रकांत दादांविषयी बोलता?” असा बोचऱ्या शब्दात उमा खापरे यांनी रुपाली चाकणकर यांना टोला लगावला. “आमचे नेतेते जामिनावर नाही तर जमिनीवर आहेत तुमचेच गृहमंत्री १०० कोटी घोटाळ्यात अडकलेत.” असे सडेतोड उत्तर देत त्यांनी रुपाली चाकणकर त्यांची खिल्ली उडवली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button