पिंपरी / चिंचवडपुणे

नातेवाईकांच्या लग्नाला जाणे पडले महागात : मंगलकार्यालयातून सव्वादोन लाखांचा ऐवज चोरीला

पिंपरी l प्रतिनिधी

नातेवाईकांच्या लग्नासाठी जाणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. मंगल कार्यालयात गेलेल्या महिलेची पर्स अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. पर्समध्ये दोन लाख 22 हजारांचा ऐवज होता. ही घटना 7 बावधन येथील मुहूर्त लॉन्स येथे घडली.

सीमा हंबीरराव आडनाईक (वय 40, रा. सहकारनगर, पुणे) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. 15) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या घरातील मंडळी 7 डिसेंबर रोजी रात्री बावधन येथील मुहूर्त लॉन्स येथे नातेवाईकाच्या लग्नासाठी गेल्या होत्या. रात्री पावणे नऊ ते साडेनऊ वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांची पर्स चोरून नेली. त्यामध्ये सोन्याचे दागिने, रोख रक्कम, पैसे असा एकूण दोन लाख 22 हजारांचा ऐवज होता. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button