breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मनसेच्या महामोर्चाबाबत नागरिकांना जागृत करा, बाळा नांदगावकरांच्या कार्यकर्त्यांना सूचना

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

बांगलादेशी, पाकिस्तानी आणि नायजेरियन घुसखोरांना भारताबाहेर काढण्यासाठी 9 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भव्य महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी पक्षाचे शहरातील पदाधिकारी, विधानसभा प्रमुख तसेच विभाग प्रमुखांनी नागरिकांना आपल्या लढ्याबाबत जागृत करण्यासाठी प्रयत्नशील राहवे, अशा सूचना पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी पिंपरीतील पदाधिका-यांना दिल्या.

पिंपरी-चिंचवडमधील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी नांदगावकर यांनी मोरवाडी येथील एका हॉटेलमध्ये शनिवारी (दि. 1) सायंकाळी पक्षाची बैठक घेतली. बैठकीत नेते शिरीष सावंत, बाबू वागस्कर, शहर प्रभारी किशोर शिंदे, गणेश सातपुते, रंजीत शिरोळे, शहराध्यक्ष तथा मनसे गटनेते सचिन चिखले आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बाळा नांदगावकर म्हणाले की, पक्षाने आता कात टाकली आहे. नव्या दमाने कामाला लागायचे आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद देऊन जबाबदारी दिली जाणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. नायजेरियन, बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकलून लावण्यासाठी तिव्र स्वरुपाचा लढा उभारला जाणार आहे.

भूमिपुत्रांच्या हितासाठी आणि देशाच्या विकासासाठी मनसे जोमाने कामाला लागली आहे. आता कार्यकर्त्यांनी सुध्दा तितक्याच जोमाने कामाला लागण्याची गरज आहे. नागरिकांमध्ये आपण काढत असणा-या मोर्चाविषयी सविस्तर माहिती पोहोचविण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. देशाप्रती प्रेमभावना जागृत करून जास्ती जास्त लोकांना मोर्चामध्ये सहभागी करून घेण्यासाठी प्रत्येकाने कामाला लागावे, अशा सूचना नांदगावकर यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button