breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयगणेशोत्सव-२०२३ताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

भारतात राहणाऱ्या प्रत्येकाचा डीएनए हिंदूच; मोहन भागवतांचं मोठं विधान

नवी दिल्ली । महाईन्यूज । प्रतिनिधी ।
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी पुन्हा एकदा हिंदूंबाबत एक मोठं विधान केलं आहे. भारतातील प्रत्येक व्यक्तीची डीएनए हिंदूच असल्याचे मोहन भागवत म्हणाले आहेत. आपल्या देशात देवाती पूजा, भक्ती वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. त्या धार्मिक विधी कोणी बदलण्याची गरज नाही. कारण कोणत्याही माध्यमातून केलेली प्रार्थना एकाच ठिकाणी जाते, असं मोहन भागवत म्हणाले. छत्तीसगडच्या सुरगुजा जिल्ह्यातील अंबिकापूरमध्ये आयोजित स्वयंसेवकांच्या कार्यक्रमात हे बोलत होते.

मोहन भागवत पुढे म्हणाले की, 40 हजार वर्षांआधीपासून अखंड भारताचा डीएनए एकच आहे. काबूलच्या पश्चिमेपासून ते छिन्दविन नदीच्या पूर्वेपर्यंत तिबेटच्या उत्तरेपासून म्हणजेच चीनपासून ते श्रीलंकेच्या दक्षिणेपर्यंतच्या प्रदेशात जे लोक राहतात. त्या सर्व लोकांचा डीएनए 40 हजार वर्षांपासून एकच आहे. तो म्हणजे हिंदू, 40 हजार वर्षांपासून आपल्या साऱ्याचे पूर्वज एकच आहेत.

मोहन भागवत म्हणाले की, ही भारताची प्राचीन विशेषता आहे. संपूर्ण जगात हिंदू धर्म ही एकमेव कल्पना आहे. जी सर्वांना सोबत घेऊन जाण्यावर विश्वास ठेवते. विविधतेत एकता हीच भारताची ओळख आहे. भारतात राहणारी प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे, असं आम्ही आरएसएसची स्थापना (1925 साली) झाल्यापासून ठामपणे सांगत आहोत.

भारतात राहणारा प्रत्येकजण हिंदू आहे. जे लोक भारतात आपली मातृभूमी मानतात आणि ही विविधता असून एकतेच्या संस्कृतीवर विश्वास ठेवून एकत्र राहू इच्छितात ते हिंदू आहेत. धर्म, संस्कृती, भाषा, खाण्यापिण्याच्या सवयी किंवा विचारसरणी काहीही असो, सर्व हिंदूच आहेत, या दिशेने आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत, असही मोहन भागवत म्हणाले.

संघाचे कार्य वैयक्तिक आणि राष्ट्रीय चारित्र्य घडवणे आणि लोकांमध्ये एकता आणणे आहे, सर्व भारतीयांचा डीएनए समान आहे आणि त्यांचे पूर्वज समान आहेत. 40,000 वर्षे जुन्या अखंड भारताचा भाग असलेल्या प्रत्येक भारतीयाचा डीएनए समान आहे. असही मोहन भागवत म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button