breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जनसंवादात इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिकेच्या क प्रभागमध्ये दिनांक १४ नोव्हेंबर रोजी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत चिखली मोशी येथील इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
इयत्ता पाचवी मधील विद्यार्थ्यांनी, त्यांना रोजच्या जीवनात भासणाऱ्या समस्या, अडचणी यांचे कथन महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या समोर मांडले.
रिव्हर रेसिडेन्सी जवळील, आमच्या शाळेच्या रस्त्यावर, अनेक खड्डे आहेत ज्यामुळे अनेक अपघात होतात, कृपया यावर उपाय सांगा? आम्हाला भटक्या कुत्र्यांचा खूप त्रास होतो, ते वाहनाच्या मागे धावतात आणि काही वेळा चावतात.
मोशी, चिखली परिसरात, रात्री वीजपुरवठा खंडित होतो, त्यामुळे आमच्या अभ्यासावर परिणाम होतो. डेंग्यू सर्वच भागात मोठ्या प्रमाणात पसरला आहे, हे थांबवण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करत आहात?
आमच्या परिसरातील रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे आढळतात, जे आमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे, हे कसे थांबवायचे कृपया सुचवा? मोशीगावामध्ये ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येते, जे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही, कृपया यावर उपाय शोधा?
शाळेच्या विद्यार्थ्यांनी अशा सामाजिक आणि आरोग्य विषयक समस्या मांडल्या. विविध प्रश्न विचारून त्यावर उपाययोजना करण्याची मागणी केली. महानगरपालिकेच्या वतीने क प्रभागच्या जनसंवादचे अध्यक्ष तथा सह-शहर अभियंता श्री. संजय कुलकर्णी, सह-आयुक्त श्री. अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता श्री. संजय घुबे यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली आणि लवकरात लवकर तुमच्या समस्या निवारण करण्याची खात्री दिली.


समाजातील विविध शासकीय यंत्रणा, त्यांची कामे, त्यांचा सहभाग आदी विषयांचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे, विद्यार्थ्यांचे नेतृत्व गुण समोर यावे, विविध प्रश्नांना सामोरे जाण्याचे धाडस यावे यासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी जनसंवाद सभेत सहभाग नोंदवला.
इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या संचालिका श्रीमती कमला बिष्ट तसेच शिक्षक वर्ग आदींचे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आभार मानले आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button